Sindhudurg: असलदे उपसरपंचपदी शिवसेनेचे सचिन परब..

0
60

लोकनियुक्त सरपंच चद्रकांत डामरे यांनी स्वीकारला पदभार;सरपंच,उपसरपंच यांचा शिवसेना नेते सतीश सावंत यांनी केला सत्कार

प्रतिनिधी- पांडुशेठ साठम

कणकवली दि.२९ डिसेंबर: तालुक्यातील असलदे सरपंच पदाचा चंद्रकांत डामरे तर उपसरपंच पदाचा सचिन परब यांनी पदभार स्वीकारला आहे. उपसरपंच पदाच्या निवडीसाठी सरपंच चंद्रकांत डामरे यांच्या अध्यक्षतेखाली सभा पार पडली. त्यात उपसरपंच पदासाठी सचिन परब यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने ही निवडणूक बिनविरोध पार पडली.त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पेढे भरवत आनंदोत्सव साजरा केला.

यावेळी सरपंच चंद्रकांत डामरे,उपसरपंच सचिन परब यांचा शिवसेना नेते सतीश सावंत यांनी ग्रामपंचायत येथे शाल,श्रीफळ घालत सत्कार करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या सभेला शिवसेना पुरस्कृत पॅनलचे उपसरपंच सचिन परब,सदस्य सुवर्णा दळवी ,स्वप्ना डामरे,आनंद तांबे तर भाजपा पुरस्कृत पॅनलच्या सदस्य विद्या आचरेकर, दयानंद हडकर , आनंदी खरात आदी नूतन सदस्य उपस्थित होते.या निवडीसाठी निवडणूक निरीक्षक आर. व्ही.मेस्त्री तर सभेचे सचिव आर. डी.सावंत यांनी काम पाहिले.

यावेळी तालुकाप्रमुख शैलेश भोगले, सचिन आचरेकर , तात्या निकम , अतुल सदडेकर , हेमंत कांडर , आबु मेस्त्री , शाखा प्रमुख सुरेश मेस्त्री , प्रदीप हरमलकर , लक्ष्मण लोके , संजय डगरे , विजय डामरे , उद्योजक सुरेश डामरे , पत्रकार नरेंद्र हडकर , अनिल तांबे , अनिल नरे ,विलास जांभळे , मनोज लोके , दयानंद लोके , छत्रुघ्न डामरे , आत्माराम घाडी , विजय परब , जयप्रकाश पाताडे , बाबु जांभळे , श्यामराव परब , महादेव परब आदींसह असलदे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकनियुक्त सरपंच चंद्रकांत डामरे म्हणाले,आपल्यावर गावातील जनतेने दाखवलेले प्रेम आणि विश्वास हे कदापि विसरणार नाही.बहुमताने मला सरपंच पदावर निवडून दिले,त्यामुळे गावातील विकासकामे मार्गी लागण्यासाठी आमचा प्रयत्न राहणार आहे.पुढील काळात सर्वांना विश्वासात घेऊन काम केलं जाईल.

उपसरपंच सचिन परब म्हणाले,आमची ग्रामपंचायत झाल्यानंतर पहिल्यांदा ४० वर्षानंतर शिवसेनेच्या माध्यमातून गावठणवाडीला उपसरपंच पदाचा बहुमान मिळाला आहे.आता या संधीच्या माध्यमातून जनतेची सेवा केली जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here