बचावकार्य करताना जीवरक्षक ही जखमी.
वेंगुर्ले : प्रतिनिधी
वेंगुर्ले तालुक्यातील रेडी यशवंतगड परिसरातील समुद्रात बुडणाऱ्या ९ वर्षीय विदेशी मुलाला वाचवण्यास यश आले आहे. ही घटना आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास घडली. बिलफ केरीलफ (रा. बेलारूस) असे त्या मुलाचे नाव आहे. बचावकार्य करताना जीवरक्षक संजय गोसावी यांच्या पायाला दुखापत झाली आहे. सुदैवाने दोघांची प्रकृती बरी आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ले-दाभोली-येथे-त/
बिलफ हा मुलगा आपल्या कुटुंबासमवेत रेडी येथील समुद्रकिनाऱ्यावर मौज मजा करत होता. परंतु पाण्याचा अंदाज न आल्यामुळे तो बुडत होता. हा प्रकार लक्षात आल्यानंतर त्याच्या कुटुंबियांसह नातेवाईकांनी आरडाओरड केली. यावेळी जीवरक्षक गोसावी यांनी त्या ठिकाणी जाऊन त्याला वाचवले. दरम्यान स्वतःच्या जीवावर उदार होऊन मुलाचा जीव वाचवणाऱ्या केरीलफ कुटुंबीयांनी गोसावी यांचे आभार मान