Sindhudurg: रहाते घर जमिन मालकाने जेसीबीने केले जमिनदोस्त

0
87
रहाते घर जमिन मालकाने जेसीबीने केले जमिनदोस्त

वेंगुर्ला प्रतिनिधी- वायंगणी-हरिचरणगिरी येथील रविद्र कोरगांवकर यांचे घर तेथेच रहाणारे जमिन मालक रमण खानोलकर यांचेसह चौघांनी जेसीबीच्या सहाय्याने जमिनदोस्त केल्याने रूपेश रविंद्र कोरगांवकर यांनी पोलीसांत तक्रार केली असून वेंगुर्ला पोलीसांनी संशयितांविरूध्द चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बीडीडी-चाळींच्या-कामां/

वायंगणी-हरीचरणगिरी येथील रूपेश रविद्र कोरगांवकर याने वेंगुर्ला पोलीसांत दिलेल्या पहिल्या तक्रारीत आपले जुने घर वायंगणी ग्रामपंचायत घर नंबर ६५९ हे घर आपले वडील रविंद्र शिवराम कोरगांवकर यांचे नावे आहे. वायंगणी-हरीचरणगिरी येथे राहणारे रमण खानोलकर हे वारंवार आमचे घरी येवुन तुमचे घर माझे जमिनीत आहे, ते खाली करा नाहीतर पाडून जमिनदोस्त करणार अशी माझ्या वडीलांना धमकी देत असत. तसेच मागील १५ दिवसा पासून शैलेश खानोलकर हा देखील मोबाईलवरून तुमचे जुने घर आमच्या जमिनीत आहे. ते खाली करा नाहीतर पाडून जमिनदोस्त करणार अशी मला धमकी देत होता. दि.७ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजताच्या दरम्याने रमण खानोलकर त्याचा पुतण्या शैलेश खानोलकर व रमण खानोलकर यांचा मुलगा (नाव माहित नाही) सर्व राहणार हरिचरणगिरी-वायंगणी हे जे.सी.पी. घेऊन त्या जमिनीत आमचे वायंगणी ग्रामपंचायत नंबर ६५९ जवळ आले असता माझे आई-वडील हे त्या ठिकाणी जावून, आमचे घर पाडू नका असे त्यांना सांगितले. असता त्यांनी माझ्या आईला ढकलून देवून तो निघुन गेला. परत आलीस तर मारणार अशी धमकीही दिली.

सायंकाळी सुमारे ७.३० वाजता मी घरी गेलो असतानाआमचे वायंगणी ग्रामपंचायत घर नंबर ६५९ हे घर पाडून जमिनदोस्त केल्याचे दिसून आले. म्हणून मी व माझ्या वडीलांनी पाडलेल्या घराचे भागांत फिरून खात्री केली असता घरात ठेवलेल्या खालील वर्णनाच्या व किंमतीच्या सोन्याचे दागिने व जुनी भांडी व कागदपत्रे वरील आरोपीत यांनी चोरून नेल्याचे लक्षात आले.

या घटनेची तक्रार वेंगुर्ला पोलीसांत दि.७ रोजी रात्रौ. १० वाजता देताना रूपेश कोरगांवकर यांना न्याय मिळावा या उद्देशाने गावातील माजी पंचायत समिती सदस्य समाधान बांदवलकर, सामाजिक कार्यकर्ते योगेश तांडेल, एकनाथ राऊळ, वायंगणी सरपंच सुमन कामत, उपसरपंच हर्षद साळगांवकर, दाभोली ग्रामपंचायत सदस्य श्रीकृष्ण बांदवलकर, वैभव हळदणकर, मनोज गोवेकर, श्यामसुंदर मुणनकर, अर्जुन कोरगांवकर, बाळासाहेबांची शिवसेनेचे तालुका प्रमुख नितीन मांजरेकर, ठाकरे शिवसेनेचे वेंगुर्ला शहर प्रमुख अजित राऊळ, अवि दुतोंडकर, काका आकेरकर, नरेश बोवलेकर, आडेली ग्रामपंचायत सदस्य तात्या कोंडसकर, श्री. बांदिवडेकर, दिपक कुंडेकर आदी वेंगुर्ले पोलीस स्टेशनच्या ठिकाणी दाखल झाले होते.

या प्रकरणांत दाभोली व वायंगणी या दोन्ही गावातील लोक रूपेश कोरगांवकर यांना न्याय मिळवून देण्यासाठी एकवटलेले असून त्याचा एक भाग म्हणून अन्याय होत असल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे.

फोटोओळी – रविद्र कोरगांवकर यांचे घर जमिनदोस्त केल्यानंतर रुपेश कोरगांवकर याने वेंगुर्ला पोलिसात तक्रार दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here