Maharashtra: 27 वी राष्ट्रीय् रोड रेस स्पर्धा महाराष्ट्राच्या अपूर्वा गोरेला गोल्ड

0
95
27 वीराष्ट्रीय् रोड रेस स्पर्धा ; महाराष्ट्राच्या अपूर्वा गोरेला गोल्ड

सिन्नर, दि. ९ (क्री.प्र.) – २७ व्या राष्ट्रीय रोड रेस स्पर्धेतील तिसऱ्या दिवशी अपूर्वा गोरेने गोल्ड पदकाची कमाई करत दिवसातील  महाराष्ट्राला पाहिलं गोल्ड पटकावून दिलं . महिलांच्या ज्युनियर गटात  अपूर्वा गोरे बरोबर महाराष्ट्राच्या पूजा दानोलेनेही चांगली कामगिरी करत रौप्य पदकाची कमाई केली. ११ जानेवारीपर्यंत चालणारी हि स्पर्धा नव्याने निर्माण करण्यात आलेल्या समृध्दि महामार्गावर घेण्यात येत आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-रहाते-घर-जमिन-मालकाने-जे/

महिलांच्या ६० किलोमीटर जुनिअर गटात झालेल्या या स्पर्धेत अपूर्वाने १ तास ४९ मिनिटे आणि ४३.५४७ सेकंदाची वेळ घेत गोल्ड मेडलवर आपलं नाव कोरलं . त्यासाठी तिने ३२.८१ किलोमीटर प्रतितास वेगाची नोंद करत तिने हि कामगिरी केली. अपूर्वाबरोबरच महाराष्ट्राच्या पूजा दानोलेसुद्धा १ तास ५१ मिनिटे आणि ४९.८३५ सेकंदाची नोंद करत  रौप्य पदक मिळालं. तामिळनाडूच्या कस्तुरीने पूजा ला चांगलीच फाइट दिली. मात्र सेकेंडच्या शताऊंश फरकाने पूजाने रौप्य पदक आपल्या नावावर केलं. कस्तुरीने १ तास ५१ मिनिटे आणि ४९.८३६ सेकंदाची नोंद करत कांस्य पदकाची कमाई केली. महाराष्ट्र्राची संस्कृती खेसेला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावं लागलं. इतर गटामध्ये महाराष्ट्राने  दिवसभरात १ रौप्य आणि ३ कांस्य पदकांची कमाई केली.

स्पर्धेचे थेट प्रक्षेपण

२७ वी राष्ट्रीय रोड रेस हि स्पर्धा हि फेसबुक वरून लाईव्ह दाखवली जातेय.  राष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या इतिहासात पहिल्यांदाच अश्या प्रकारे कोणत्याही स्पर्धेचं थेट प्रक्षेपण दाखवण्यात येतंय. त्यामुळे हजारोंच्या संख्येने सायकल प्रेमी या स्पेर्धेचा आनंद लुटत आहे. सायकलिंग फेडरेशन ऑफ महाराष्ट्र यांच्या फेसबुक पेजवरून हे थेट प्रक्षेपण केले जात आहे

फोटो caption –महिलांच्या ज्युनियर गटात महाराष्ट्राला  गोल्ड आणि सिल्वर मेडल मिळवून देणारी अपूर्वा गोरे (डावीकडे)  आणि  पूजा दानोले. (उजवीकडे)

    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here