भारत पेट्रोलियमतर्फे भारतीय सैन्यदलासाठी कमी धूर निर्मिती करणारे दर्जेदार केरोसीन ऑइल लाँच

0
144
भारत पेट्रोलियमतर्फे भारतीय सैन्यदलासाठी कमी धूर निर्मिती करणारे दर्जेदार केरोसीन ऑइल लाँच

मुंबई – भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) या महारत्न आणि फॉर्च्युन ग्लोबल ५०० कंपनीने आज जम्मूतील भारतीय सैन्यदलासाठी कमी धूर निर्मिती करणारे सुपिरियर केरोसिन ऑइल (एसकेओ) लाँच केल्याचे जाहीर केले.

बीपीसीएल ही सैन्यदलासाठी नव्या एलएसएलए दर्जाच्या एसकेओचा पुरवठा सुरू करणारी पहिली ओएमसी ठरली असून यामुळे पर्यावरण जतनासाठी मोठा हातभार लागेल तसेच एसकेओच्या वापराने धूर आणि त्याच्या वासाशी संबंधित समस्या कमी होतील.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-पाल-गावातील-विकासकामे-व/

नेहमीचे केरोसिन मोठ्या प्रमाणात धूर तयार करत असल्यामुळे विरळ हवा आणि कमी ऑक्सिजन पातळी असलेल्या ठिकाणी त्याचा वापर करणाऱ्या सैन्यदलाच्या आरोग्यासाठी ते घातक ठरू शकते. म्हणूनच दुर्गम भागात कार्यरत असलेल्या आपल्या सैनिकांच्या हितासाठी कमी धूरनिर्मिती करणारे केरोसीन महत्त्वाचे पाऊल आहे.

बीपीसीएलचे संचालक (एचआर), संचालक (वित्त) आणि सी अँड एमडीचा अतिरिक्त पदभार हाताळणारे श्री वेत्सा रामकृष्ण गुप्ता यांनीबीपीसीएल आणि सैन्यदलाच्या प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या सहकार्याविषयी अभिमान व्यक्त केला तसेच हे नाते भविष्यातही अनेक वर्ष कायम राहील असा विश्वास दर्शवला. लेफ्टनंट जनरल एम के एस यादव यांनीही याच भावना व्यक्त करत ईस्टर्न कमांडमध्ये एचएसडी (विंटर ग्रेड) सुरू करण्यासाठी बीपीसीएलने घेतलेल्या प्रयत्नांची आठवण काढली. एलएसएलए ग्रेड लाँच केल्याबद्दल त्यांनी बीपीसीएलचे कौतुक केले आणि यामुळे दुर्गम भागात कार्यरत असलेल्या सैनिकांची परिस्थिती उंचावेल असा विश्वास व्यक्त केला.

याप्रसंगी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक (विपणन) श्री सुखमल जैन म्हणाले, ‘मातृभूमीच्या संरक्षणासाठी सातत्याने झटणाऱ्या आपल्या सैनिकांचे धाडस, मेहनत आणि चिकाटी अतुलनीय आहे. अतिशय अवघड परिस्थिती आणि उंचावर राहून ते निःस्वार्थीपणे आपला देश व त्यात राहाणाऱ्या नागरिकांचे संरक्षण करत असतात ते पाहाता त्यांना केवळ आदराने सलाम करायला हवा. विरळ तापमान असलेल्या ठिकाणी काम करत असलेल्या सैन्यदलाला लो स्मोक सुपिरियर केरोसिन ऑइलचा पुरवठा करणे हे आमचा त्यांचे आभार मानण्याचा प्रयत् व त्यांचे आयुष्य थोडे सुलभ करण्याचा प्रयत्न आहे.’

याप्रसंगी बीपीसीएलचे कार्यकारी संचालक (औद्योगिक आणि व्यावसायिक) श्री एस जेना म्हणाले, ‘सध्या बीपीसीएलचा भारतीय सैन्यदलातील वाटा १६ टक्के असून ते वार्षिक पातळीवर ७० टीकेएल पेट्रोलियम उत्पादनांचा पुरवठा करतात. बीपीसीएलने भारतीय सैन्यदलाशी १०० कन्झ्युमर पंप पुरवण्यासाठी तसेच महत्त्वाचे उपक्रम राबवण्यासाठी आणि धोरणात्मक ठिकाणी ‘स्कॅटर्ड स्टोअरेज लोकेशन्स’ पुरवण्यासाठी सैन्यदलाशी भागिदारी केली आहे.’

आमच्या जम्मू डेपोतून एलएसएलए ग्रेडचे एसकेओ वाहून नेणाऱ्या पहिल्या लॉरीला व्हर्च्युअल पातळीवर लेफ्टनंट जनरल मनोज के एस यादव, एसएम, पुरवठा आणि वाहतूक विभागाचे संचालक, इंटिग्रेटेड एचक्यू आणि एमओडी आणि श्री. व्ही आर के गुप्ता, संचालक (वित्त) अतिरिक्त पदभार सी अँड एमडी व एचआर यांनी श्री. संजय खन्ना, संचालक (रिफायनरीज), श्री. सुखलाल जैन, संचालक (विपणन) आणि मेजर जनरल अशोक चौधरी व्हीआरसी एडीजीएसटी (एफटी) यांच्या उपस्थितीत झेंडा दाखवला.

सैन्यदलासाठी केला जाणारा एसकेओचा पुरवठा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण विरळ तापमान असलेल्या कॅम्प्समध्ये रूम हीटर्ससाठी (बुखारी) त्याचा इंधन म्हणून वापर केला जातो. सैन्यदलाला त्यांच्या नॉर्दन आणि ईस्टर्न कमांडसाठीएसकेओचा ७० टीकेएल/ए पुरवठा आवश्यक असतो. नॉर्थन कमांडला जास्त म्हणजे ४५ टीकेएल/ए पुरवठा आवश्यक असतो. लो स्मोक केरोसीन आपल्या देशाच्या शूर सैनिकांना हरित इंधन पुरवण्याच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल आहे.

उत्पादन संशोधनाच्या टप्प्यावर बीपीसीएलच्या औद्योगिक आणि व्यावसायिक (आय अँड सी) विभागाने कॉर्पोरेट रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेंटर (सीआरडीसी) आणि मुंबई रिफायनरी यांच्या सहकार्याने अद्ययावत एसकेओची निर्मिती केली. ती करताना स्मोट पॉइंट आणि अरोमॅटिक कंटेंट असे निकष लक्षात घेण्यात आले, तसेच कारू (लेह- लडाख) आणि गंगटोक येथे त्याची प्रत्यक्ष चाचणी घेण्यात आली.

या यशस्वी चाचण्यांच्या मदतीने बीपीसीएलच्या आय अँड सी विभागाने खास लॉजिस्टिक व्यवस्था करत त्यानुसार जम्मू डेपोला बॅच रवाना केली. अद्ययावत एसकेओचा नियमित पुरवठा लवकरच सुरू केला जाईल. लेह येथील आर्मी कोअर १४ सह सहकार्य करताना बीपीसीएलला आनंद होत असून या ठिकाणी कंपनीने अखंड ज्योत स्थापन केली आहे व त्यासाठी एलपीजीचा सातत्यपूर्ण पुरवठा केला जातो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here