Sindhudurg: खर्डेकर महाविद्यालयाच्या कामाकाजाबाबत नॅक समितीकडून समाधान

0
25
खर्डेकर महाविद्यालयाच्या कामाकाजाबाबत नॅक समितीकडून समाधान

वेंगुर्ला प्रतिनिधी- राष्ट्रीय मुल्यमापन व अधिस्वीकृती परिषद, बेंगलोर नॅकच्या तज्ज्ञ समितीने ११ व १२ जानेवारी रोजी वेंगुर्ला येथील बॅ.बाळासाहेब खर्डेकर महाविद्यालयास भेट देऊन बैठक घेतली. प्रारंभी प्राचार्य डॉ.विलास देऊलकर यांनी या समितीचे स्वागत केले. तर महाविद्यालयाच्या एन.सी.सी.कॅडेटस्नी सलामी दिली. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-क्रिकेट-प्रशिक्षक-हेम/

त्यानंतर या समितीने महाविद्यालयातील सर्व विभागांना भेट देऊन महाविद्यालयाच्या कामकाजासंबंधी माहिती घेतली. या समितीचे चेअरमन डॉ.खाजा अल्थाफ हुसेन (हैद्राबाद तेलंगणा), समन्वयक सदस्य डॉ.बी.एस.सुरेश (म्हैसूर-कर्नाटक) व सदस्य डॉ.श्रीकांता सामंता (नबाग्राम-पश्चिम बंगाल) हे उपस्थित होते. नॅक तज्ज्ञ समितीची शिक्षण प्रसारक मंडळ, कोल्हापूरचे सचिव प्रा.जयकुमार देसाई, चेअरमन डॉ.मंजिरी मोरे, पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई यांच्याशी बैठक झाली. तसेच महाविद्यालयाचे माजी व आजी विद्यार्थी, पालक यांच्याशी महाविद्यालयाचे बलस्थाने व विकास याबाबत चर्चा झाली. तर महाविद्यालयाचे प्राचार्य व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष सदस्या यांच्यासोबत बैठक झाली. नंतर त्याच समितीने प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्याशी ‘उपलब्ध संधी आणि आव्हाने‘ याविषयी चर्चा केली. महाविद्यालयाच्या कामकाजाबाबत नॅक समितीने समाधान व्यक्त केले. महाविद्यालयाच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक म्हणून प्रा.डी.बी.राणे व सहाय्यक समन्वयक प्रा.बी.एम.भैरट यांनी काम पाहिले.

फोटोओळी – एन.सी.सी.कॅडेटस्नी नॅकच्या तज्ज्ञ समितीच्या स्वागत प्रसंगी सलामी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here