मुंबई I अनुज केसरकर
हडपसर येथे श्री गजानन एज्युकेशन सोसायटीच्या स्मार्ट किड्स शाळेचा वार्षिक कार्यक्रम शनिवार दिनांक 1 4/01/2023 रोजी संपन्न झाला.शाळेच्या वार्षिक कार्यक्रमात नर्सरी, प्ले ग्रुप, सिनिअर केजी मुलांनी भाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणेपद श्री. अनुज केसरकर यांनी भूषविले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-अंगणवाडी-सेविकांसाठी-१/
या कार्यक्रमात मुलांनी अतिशय सुंदर नृत्य, गाणी, आणि आपल्या बोलण्याने समोरील रसिक प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. संस्थेच्या संस्थापिका क्षीरसागर मॅडम यांनी अतिशय नेटके नियोजन केले. या लहान निरागस मुलांना त्यांच्या पालकांना सन्मानचिन्ह देताना माझे हात भारावले होते असे उदगार श्री अनुज केसरकर यांनी काढले. आपल्या शाळेच्या शाखा विस्तारत आहेत. लवकरच संस्थेचे रूपांतर वटवृक्षात होईल असेही ते म्हणाले.