Sindhudurg: मानसीश्वर जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी 

0
83
मानसीश्वर जत्रोत्सवाला भाविकांची गर्दी

वेंगुर्ला प्रतिनिधी- येथील प्रसिद्ध मानसीश्वर जत्रोत्सवाला पहाटेपासूनच भाविकांनी गर्दी करीत भक्तिभावाने श्रींचे दर्शन घेतले. भगव्या रंगाच्या उंचच उंच निशाणांनी परिसर भगवामय झाला होता. 

 उभादांडा येथील मानसीश्वराचा जत्रौत्सव आज रविवारी मोठ्या भक्तीमय वातावरणात हजारो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. या जत्रौत्सवाच्या पार्श्वभूमीवर गेले काही दिवस मंदिराच्या आजूबाजूला दुकानांसाठी छोटे-मोठे मंडप उभारुन विक्रेत्यांनी आपली जागा निश्चित केली होती. जत्रोत्सवाच्या आदल्यादिवशीपासून काही दुकाने सुरु झाल्याने याठिकाणी जत्रोत्सवाचा माहोल निर्माण झाला होता. रविवारी पहाटेच जत्रोत्सवाला सुरुवात करण्यात आली. सुरुवातीला मानाची निशाणे अर्पण केल्यानंतर उर्वरित भाविकांनी केळी, नारळ, निशाणे अर्पण करण्यास सुरुवात केली. जत्रौत्सवानिमित्त नारळ, केळी, निशाणे याबरोबरच विविध खेळणी, गृहपयोगी वस्तू, मिठाई, हॉटेल्स यांची दुकाने मोठ्या प्रमाणात मांडण्यात आली होती. देवदर्शनानंतर भाविकांनी येथील विविध दुकानांना भेटी देत मोठ्या प्रमाणात खरेदी करीत खाद्यपदार्थांचा आस्वाद लुटला.   

फोटोओळी- मानसीश्वर जत्रौत्सवाला झालेली भाविकांची गर्दी.    

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here