मनोरंजन: चित्रपट उद्योगाला गतिवान करण्यासाठी निर्माते इसरानी यांचे नवीन ऑनलाइन पोर्टल!

0
174
New Online Portal Takes the Film Industry by Storm

मुंबई –  भारत – इसरानी एंटरटेनमेंट लिमिटेडचे संस्थापक आणि संचालक राज इसरानी यांनी भारतीय सिनेमाचा समृद्ध इतिहासाचे संवर्धन आणि जतन करण्याच्या उद्देशाने “www.indianfilmhistory.com” हे नवीन ऑनलाइन पोर्टल सुरू केले आहे. 40 वर्षांहून अधिक काळ त्यांचा चित्रपट उद्योगातील अनुभव असून या अनुभवाची शिदोरी घेऊन ते ज्ञान आणि उत्कटतेचा खजिना “www.indianfilmhistory.com” या पोर्टलच्या माध्यमातून घेऊन आले आहेत.

www.indianfilmhistory.com” ही वेबसाइट भारतीय सिनेमाशी संबंधित सर्व गोष्टींसाठी एक व्यापक ऑनलाइन संसाधन(रिसोर्स) आहे. यात चित्रपट,  अभिनेते,  दिग्दर्शक, निर्माते आणि मनोरंजन उद्योगातील सर्व प्रमुख विभागांचा विस्तृत डेटाबेस तसेच भारतीय चित्रपट इतिहासाची सर्वसमावेशक टाइमलाइन आहे. तसेच या पोर्टलवर बॉलीवूड, दक्षिण भारतीय चित्रपट आणि मराठी, बंगालीसह भारतातील सर्व प्रादेशिक भाषेतील चित्रपट उद्योगांची तपशीलवार माहिती देखील उपलब्ध होणार आहे.

“या पोर्टलची संकल्पना भारतीय चित्रपटांबद्दलच्या माझ्या प्रेमातून आणि भावी पिढ्यांसाठी त्याचा समृद्ध इतिहास जतन करण्याच्या माझ्या इच्छेतून आली”, असे राज इसरानी म्हणाले. “चित्रपट उद्योगात चार दशकांहून अधिक काळ घालवलेल्या व्यक्तीच्या रूपात,  मी भारतीय सिनेमाची उत्क्रांती पाहिली आहे. मला एक व्यासपीठ तयार करायचे आहे जिथे लोकांना हा समृद्ध वारसा आणि त्याविषयीची सर्व माहिती एका क्लिकवर सहज उपलब्ध होईल, आजच्या नव्या दमाच्या कलावंताना त्यांच्या दर्जेदार कलाकृती तयार करताना हा इतिहास मार्गदर्शकाच्या भूमिकेत असेल.”

www.indianfilmhistory.com या पोर्टलच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे त्याचा सर्वसमावेशक चित्रपट डेटाबेस आहे, ज्यामध्ये कलाकार आणि क्रू मेम्बर्स, रिलीजडेट्स आणि बॉक्स ऑफिस कलेक्शनसह हजारो चित्रपटांची माहिती समाविष्ट आहे. “www.indianfilmhistory.com” या वेबसाइटमध्ये भारतीय चित्रपट इतिहासातीळ वैभवशाली घटना, भारतीय चित्रपटसृष्टीच्या विकासातील महत्वाचे टप्पे यांविषयी सखोल माहिती पुरविते. त्याच्या डेटाबेस व्यतिरिक्त, “www.indianfilmhistory.com” चिकित्सक चित्रपट व्यावसायिकांसाठी व्यवसायाच्या नेमक्या संधी कोणत्या आहेत याबद्दलही माहिती पुरविते. वेबसाईटवर भारतीय सिनेमांशी संबंधित विविध विषयांवरील लेख, पडद्यामागील सुरस कथा, प्रसिद्ध उद्योग व्यावसायिकांच्या मुलाखती,  क्लासिक चित्रपटांच्या समीक्षांचा समावेश आहे.

हे पोर्टल वापरकर्त्यांना भारतीय सिनेमाशी संबंधित त्यांच्या स्वत:च्या आठवणी आणि अनुभव शेअर करण्यासाठी एक व्यासपीठ देखील प्रदान करते. वेबसाइटचा “कम्युनिटी” विभाग रसिकांना त्यांच्या आवडत्या चित्रपटाबद्दल , अभिनेते, कलावंत, भारतीय चित्रपट इतिहासातील मौलेवान क्षणांचे फोटो, व्हिडिओ आणि कथा शेअर करण्याची परवानगी देतो. “www.indianfilmhistory.com” हे केवळ चित्रपट रसिकांसाठी एक साधन नाही; हे उद्योग व्यावसायिक, विद्यार्थी आणि संशोधकांसाठी देखील एक मौल्यवान साधन आहे. वेबसाइटचा विस्तृत डेटाबेस आणि लेख हे भारतीय चित्रपट उद्योग, त्याचा इतिहास आणि त्याला आकार देणाऱ्या लोकांबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी एक मौल्यवान संसाधन बनवतात.

राज इसरानींबद्दल

राज इसरानी हे इसरानी एंटरटेनमेंट लिमिटेडचे संस्थापक आणि दिग्दर्शक आहेत. चित्रपट उद्योगातील 40 वर्षांहून अधिक अनुभवासह, ते भारतीय चित्रपटांच्या विकासात महत्त्वाचे भूमिका बजावत आहेत. इसरानी एंटरटेनमेंटसोबतच्या कामाव्यतिरिक्त, ते “www.indianfilmhistory.com” चे संस्थापक देखील आहेत, जे भारतीय चित्रपटसृष्टीचा समृद्ध इतिहास संवर्धन जतन करणारे आणि भारतीय चित्रपटसृष्ठीसाठी वाहून घेतलेले ऑनलाइन पोर्टल आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here