मुंबई– एसटीच्या इतिहासात पहिल्यांदाच चालक- वाहक म्हणून महिलांची नियुक्ती होणार आहे. राज्यातील २१ विभागांत २०६ पैकी १६० चालक महिलांचे प्रशिक्षण अंतिम टप्प्यात असून लवकरच या महिला चालक एसटीचे स्टेअरिंग आपल्या हातात घेणार आहेत. यामध्ये आदिवासी भागातील काही महिलांचा देखील समावेश आहे. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-दिगंबर-मोबारकर-यांचे-अल/
एसटीत सध्या सुमारे चार हजार महिला वाहक आहेत. आता चालक म्हणूनही महिला काम करणार आहेत. महिला चालकांची भरती प्रक्रिया वर्ष २०१९ मध्ये राबविण्यात आली. महिला चालक भरती प्रक्रियेत ६०० अर्ज आले होते. कागदपत्रांची छाननी करून त्यातून सर्वसाधारण भागांतील १९४ तर आदिवासी भागातील २१ महिलांची निवड झाली. प्रशिक्षणानंतर शिकाऊ अनुज्ञप्ती (लायसन्स) प्रशिक्षण आणि अंतिम चाचणीनंतर या महिला चालक २०२१ मध्ये सेवेत रुजू होणे अपेक्षित होते. परंतु कोरोनामुळे त्यांचे प्रशिक्षण रखडले. कोरोनाचे संक्रमण कमी झाल्यांनतर या उमेदवारांचे एक वर्ष अवजड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण पुन्हा सुरू झाले. पुण्यातील भोसरी येथे एसटीचे टेस्टिंग ट्रक आहे. तेथे अंतिम चाचणी होऊन त्यांची अंतिम निवड होणार आहे. सुरुवातीला त्यांना कमी अंतराच्या मार्गावरच काम दिले जाणार आहे.