सिंधुदुर्ग जिल्हा श्री.विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या वतीने आ. वैभव नाईक यांचा सत्कार
सिंधुदुर्ग जिल्हा श्री.विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या वतीने झाराप येथे श्री.विश्वकर्मा जयंती आज साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी भेट दिली. याप्रसंगी समाज मंडळाच्या वतीने आमदार वैभव नाईक यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी आ. वैभव नाईक यांनी सिंधुदुर्ग जिल्हा श्री. विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाच्या उपक्रमांचे कौतुक करत समाजासाठी सर्वोतपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मालवण-तालुक्यातील-रस्त/
याप्रसंगी झाराप सरपंच दक्षता मेस्त्री, सिंधुदुर्ग जिल्हा श्री. विश्वकर्मा सुतार शिल्पकार समाज मंडळाचे अध्यक्ष शरद मेस्त्री, नारायण मेस्त्री, अशपाक कुडाळकर, स्वप्नाली मेस्त्री, माजी सरपंच प्रभाकर मेस्त्री, मंडळाचे माजी अध्यक्ष आनंद मेस्त्री, विष्णू माणगावकर आदी उपस्थित होते.


