मालवण नगरपरिषद वसाहत येथील घटना
मालवण : मालवण शहरात नगरपरिषदच्या वतीने आर्थिक दुर्लभ घटक योजनेअंतर्गत तीन मजली इमारत बांधकाम सुरू आहे. बाजूला कर्मचारी वसाहत आहे. इमारत बांधकाम सुरू असताना दोन फूट लांबीचा एक लोखंडी रॉड कर्मचारी वसाहत येथील नावीन्य मेस्त्री या पाच वर्षच्या मुलाच्या अंगावर पडल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. जखमी मुलावर रुग्णालयात उपचार करण्यात आले. सध्या मुलाची प्रकृती स्थिर आहे.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-महाडीबीटी-पोर्टलवर-तात/


