महाड- रंगगंध कलासक्त न्यास,चाळीसगाव आयोजित जागतिक पातळीवर होणारी अभिवाचन स्पर्धेची प्राथमिक फेरी महाड केंद्रामध्ये संपन्न झाली. या फेरी करीता प्रसिद्ध अभिनेते श्री महेश जोशी (कलर्स वरील रमा राघव,मालिका फेम) व प्रसिद्ध व्याख्यात्या, कीर्तनालंकार सौ.प्रवेशा खोत-भोईर यांनी परीक्षण केले. ही फेरी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यातील साहित्य प्रेमीसाठी घेण्यात आली होती. या स्पर्धेमध्ये एकूण आठ संघानी सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/kokan-थार-दुचाकी-अपघातातील-गंभ/
कोकण विभागात रंगगंध कलासक्त न्यास,चाळीसगाव या संस्थेने प्रथमच महाड येथे या स्पर्धेसाठी प्राथमिक फेरी केंद्र घेतले गेले. रायगड, रत्नगिरी, सिंधुदुर्ग या जिल्यातील साहित्यप्रेमीना ही संधी महाड येथील ‘आपली वाणी’ महाड, या उत्साही साहित्य प्रेमी गटाने उपलब्ध करून दिली. यासाठी रंगगंधचे प्रमुख डॉ.मुकुंद करंबेळकर व अशोक अडावदकर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. पहिल्याच प्रयत्नात या फेरीसाठी आठ संघ उस्फूर्तपणें सहभागी झाले होते.
या स्पर्धा निकाल स्वरूप पुढील प्रमाणे
सहभागी संघातून, सौ मानसी मराठे व संघ ‘अभिषेक थीएटर्स, महाड ‘ यांची 23 ते 25 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम फेरी करीता निवड करण्यात आली. त्यांनी ना.स.इनामदार यांच्या ‘शिकस्त’ कादंबरीची निवड केली होती. रंगगंधच्या अंतिम फेरीत जाणे हे अनेकांचे स्वप्न असते, आणि त्या फेरीत स्थान प्राप्त करने ही खूप मोठी बाब आहे.
उर्वरित सात संघातून स्थानिक पातळीवर तीन संघ प्रथम, द्वितीय, तृतीय या क्रमांकाने गौरविण्यात आले. कारण अंतिम फेरीत जाणे ही चुरस संपलेली नसून अंतिम फेरीत निवड झाली असली तरी यापुढेही या निवड झालेल्या स्पर्धकांनी अजून जोमाने प्रयत्न करत रहावे याकरिता प्रोत्साहन म्हणून स्थानिक पातळीवर पारितोषिके दिली जात आहेत. या व्यतिरिक्त वैयक्तिक वाचिक अभिनयाची चार प्रमाणपत्र देण्यात आली. सर्वांना सहभाग प्रमाणपत्रही देण्यात आले.
महाड केंद्र प्राथमिक फेरीचा अंतिम निकाल पुढील प्रमाणे.
चाळीसगाव येथे होणाऱ्या अंतिम फेरीसाठी निवड
(अभिषेक थियेटर्स समूह) मानसी मराठे,अभिषेक मराठे आणि स्मिता पवार
उर्वरित ७ संघांपैकी
प्रथम क्रमांक – ₹700/- एम के ग्रुप, बिरवाडी, (मंगेश कंक) – स्वलिखीत ‘ बडी बात’ कथा
द्वितीय क्रमांक – ₹500/- ‘गीत गंधार’ महाड,(गंगाधर साळवी) ‘स्वलिखत’ ‘आमाला पन शिकुला हवा’ कथा
तृतीय क्रमांक ₹300/- मंगल ज्योती महाड,(मंगल गांधी) पांघरूण- कथा,लेखक – मधु मंगेश कर्णिक या संघाना प्रदान करण्यात आली.
ही सर्व रोख रक्कम पारीतोषीके महाडच्या लाईफ सोल्यूशन्स,महाड (राकेश मेहता) यांच्यातर्फे देण्यात आली. तर विद्या देसाई(मृत्युंजय), प्राजक्ता फाटक(जस्ट फ्रेंडस), कृपा सपकाळ (स्वामी), विजया पाटेकर(साजिरी), यांना वैयक्तिक वाचिक अभिनयासाठी प्रमाणपत्र देण्यात आले.
परीक्षकांनी स्वलिखित संहितेचे आवर्जून विशेष कौतुक केले. रंगगंधच्या अंतिम फेरीत सहभाग मिळण्यास स्वलिखित संहितेस वेगळे पारितोषिक असते. यातून नवे साहित्य, वेगवेगळे विषय तयार होत राहतील असा या स्पर्धेचा उद्देश आहे.
श्री.राकेश मेहता,महाड यांनी उत्तम मांडणी, चोख नियोजन करत रंगगंधच्या महाड केंद्राची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडली. या स्पर्धा पार पाडण्यासाठी अजित पवार साहेब जिल्हा ग्रंथालय कार्यालय कोमसाप जिल्हाध्यक्ष श्री सुधिर शेठ, गंगाधर साळवी, अभिनेत्री मानसी मराठे, ‘झेप’ चे संपादक अविनाश घोलप व सजावटीसाठी नवीन परमार व महाड साहित्य प्रेमींचे उत्तम सहकार्य लाभले.
या फेरी करता सर्वसोयींनी युक्त असा सभागृह कै.सुधाकर सावंत माध्यमिक शाळा, महाड यांनी उपलब्ध करून दिला. स्पर्धेची माहिती सर्वश्रृत होण्यासाठी सर्व पत्रकार बंधू रत्नागिरी, सिंधुदर्ग जिल्ह्यातील साहित्य प्रेमींचे सहकार्य मिळाले. उस्फूर्त सहकार्य करणाऱ्या सर्व साहित्य प्रेमीचे व समस्त साहित्य प्रेमी मंडळी यांचे केंद्रप्रमुख श्री. राकेश मेहता यांनी आभार मानले.
जागतिक पातळीवर होणाऱ्या या अभिवाचन महोत्सव,महाड केंद्राच्या निमित्ताने कोकण विभागातून आणखी अभिवाचक पुढे याकरिता ‘आपली वाणी’ महाड व अविरा महाड या उत्साही गटाकडून अभिवाचन कार्यशाळेचे आयोजन येत्या नजिकच्या काळात करण्यात येणार आहे. उस्फुर्त सहभागी सदस्यांना ‘आपली वाणी’ च्या माध्यमातुन यू-ट्यूब चॅनल द्वारे आपली अभिवाचन कला सादर करता येणार आहे. उस्फुर्त साहित्य प्रेमींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी आणि वाचन संस्कृतीच्या सहज प्रसारासाठी काम करणार आहे. रंगगंध कलासक्त न्यास चाळीसगाव व आपली वाणी(महाड) यांनी स्पर्धेतील सहभागी संघ, अंतिम फेरीत दाखल झालेले कलाकार व सर्व कलाकारांचे मनःपुर्वक अभिनंदन करत पुढील साहित्यीक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.