Sindhudurg: रामघाट कला क्रिडा मंडळामुळे स्थानिकांना व्यासपिठ – शितल आंगचेकर

0
32
रामघाट कला क्रिडा मंडळामुळे स्थानिकांना व्यासपिठ - शितल आंगचेक

वेंगुर्ला प्रतिनिधी-रामघाट कला क्रिडा मंडळामुळे स्थानिक महिला, पुरुष आणि मुलांना हक्काचे व्यासपिठ मिळाले आहे. सर्वांनाच यश मिळते असे नाही. तर अपयशातून यश मिळत असल्याने मिळत असलेल्या संधीचे सोने येथील विद्यार्थी करीत आहेत. अशा क्रीडाप्रकारात सहभागी होऊन राज्यस्तरीय स्पर्धांमध्य यशस्वी कामगिरी करीत असल्याचे प्रतिपादन वेंगुर्ला नगरपरिषदेच्या माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर यांनी उद्घाटनप्रसंगी केले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-क्रिकेट-स्पर्धा-म्हणजे/

 वेंगुर्ला-रामघाट येथील रामघाट कला क्रिडा मंडळाच्या तीन दिवस चालणा-या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन ८ फेब्रुवारी रोजी माजी उपनगराध्यक्ष शितल आंगचेकर हिच्या हस्ते झाले. यावेळी रामघाट कला क्रिडा मंडळाचे अध्यक्ष केदार आंगचेकरडॉ.आनंद बांदेकरजेष्ठ नागरिक प्रभाकर जबडेशशिकांत साळगांवकरसुदेश आंगचेकरनामदेव सरमळकरप्रार्थना हळदणकरदीपा पेडणेकरवैष्णवी वायंगणकरहेमंत गावडेजयेश परबबाळू धुरीजॉन डिसोजारामघाट कला क्रीडा मंडळाचे कार्यकर्ते व रामघाटमधील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते.

रामघाट कला क्रीडा मंडळ म्हणजे एकजुटीचे साधन आहे. यावर्षी महिला पाककला स्पर्धाव्हॉलीबॉल स्पर्धाफनी गेम्सरस्सीखेच स्पर्धा त्याचबरोबर १० फेब्रुवारी रोजी बक्षीस वितरण समारंभ व कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाचे ट्रीकसिनयुक्त नाटक होणार असल्याची माहिती डॉ.आनंद बांदेकर यांनी दिली.

फोटोओळी – रामघाट कला क्रिडा मंडळाच्या क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन शितल आंगचेकर यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here