वेंगुर्ला प्रतिनिधी-‘स्वच्छता ही सेवा‘ हे स्वच्छतेचे महत्त्व, तत्त्व नविन पिढीत रुजवताना नव्या पिढीच्या नव्या संकल्पना आजमाविण्यासाठी वेंगुर्ला नगरपरिषदेतर्फे कच-यातून प्रतिकृती स्पर्धेचे आयोजन केले आहे.https://sindhudurgsamachar.in/जीएसटी-कौन्सिलच्या-धर्ती/
या स्पर्धेत टाकाऊपासून टिकाऊ वस्तूंचे आपल्या कल्पकतेने प्रतिकृती बनवायच्या आहेत. या प्रतिकृती बनविताना ८० टक्के कच-यातील वस्तू व २० टक्के इतर गोष्टी वापरता येतील. ही स्पर्धा पहिली ते चौथी, पाचवी ते सातवी व आठवी ते दहावी अशा तीन गटांत घेण्यात येणार आहे. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना आकर्षक व सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात येतील.
तरी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या ‘वेस्ट टू मिरॅकल‘ म्हणजेच ‘कच-यातून कल्पकता‘ या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावे. स्पर्धेचे तसेच वस्तूंच्या प्रदर्शनाचे ठिकाण लवकरच जाहीर करण्यात येईल. अधिक माहितीसाठी स् पूर्वा मसुरकर (९४२१०७४८००) किवा वेंगुर्ला नगरपरिषद कार्यालय (०२३६६-२६२०२७) यांच्याशी संपर्क साधावा.

