Sindhudurg: काळसे येथील डंपर अपघातप्रकरणी चालकावर कडक कारवाई करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण पोलीस निरीक्षकांना सूचना

0
49
काळसे येथील डंपर अपघातप्रकरणी चालकावर कडक कारवाई करण्याच्या आ. वैभव नाईक यांच्या मालवण पोलीस निरीक्षकांना सूचना

प्रतिनिधी :पांडुशेठ साठम

कुडाळ- काळसे येथील डंपर अपघाताबाबत कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी आज सकाळी काळसे ग्रामस्थांसमवेत मालवण पोलीस ठाण्यात भेट देऊन पोलीस निरीक्षक विजय यादव यांच्याशी चर्चा करत डंपर चालक बाबू खुराशी याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या. तसेच डंपरची कागदपत्रे तपासण्यास सांगितले. या अपघातात डंपरखाली सापडून काळसे रमाईनगर येथील रुक्मिणी काळसेकर या मृत्युमुखी पडल्याने आ. वैभव नाईक यांनी दुःख व्यक्त करत काळसेकर कुटुंबियांचे सांत्वन केले. त्याचबरॊबर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क साधत अपघात स्थळी स्पीड ब्रेकर बसविण्याचे निर्देश दिले. यावेळी हरी खोबरेकर,मंदार केणी, बाबी जोगी, तपस्वी मयेकर व काळसे ग्रामस्थ उपस्थित होते.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-काजू-मशिनचे-प्रदर्शन-व-व/

काळसे होबळीचा माळ येथे गुरुवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास भरधाव वेगाने येणाऱ्या डंपरने शेतातून काम करून घरी परतत असलेल्या पाच महिलांना पाठीमागून धडक दिली. या धडकेत डंपरखाली सापडून रुक्मिणी पांडुरंग काळसेकर (५०, रा. काळसे रमाईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर या अपघातात रुक्मिणी यांच्या सोबत पादचारी अन्य चार महिला गंभीर जखमी झाल्या.जखमींना तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.रुक्मिणी यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

       

      

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here