Sindhudurg: रामघाटच्या विविध स्पर्धांचा बक्षिस वितरण संपन्न

0
20

वेंगुर्ला प्रतिनिधी-रामघाट कला क्रीडा मंडळातर्फे रामघाटवाडी मर्यादित घेतलेल्या क्रीडा महोत्सव व विविध स्पर्धाचे बक्षिस वितरण समारंभ केदार आंगचेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यामध्ये  व्हॉलीबॉल, रस्सीखेच स्पर्धा, फनी गेम्स, महिला पाककला स्पर्धा वगैरेमध्ये बक्षीस पात्र महिला, पुरुष, मुले यांचा सन्मानचिन्ह देऊन मंडळातर्फे सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-आपत्ती-व्यवस्थापन-प्रश/

      त्याचबरोबर या वाडीतील कन्या सानिया आंगचेकर हिची नेमबाजी स्पर्धेत राज्यस्तरावर सुवर्णपदक मिळवून राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याबद्दल शालश्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन तसेच संजय गावडेजयेश परबसायली आंगचेकरउर्वी गावडेसंजिवनी चव्हाणऋत्विक आंगचेकरअंकुश आजगांवकर यांचा विशेष कामगिरीबद्दल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तन्मय जोशीशीतल आंगचेकरसायली आंगचेकरजॉनी डिसोझासानिया आंगचेकरहेमंत गावडेसंजय गावडेप्रार्थना हळदणकरवैष्णवी वायंगणकर होते. यावेळी रामघाट वाडी मर्यादित घेण्यात आलेल्या स्पर्धांचे बक्षीस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

      माझ्या वाडीने केलेला माझा सत्कार हा माझ्या जीवनातील महत्वाचा क्षण आहे. मला नेमबाजी स्पर्धेत भाग घेण्यास प्रवृत्त करणारे माझे आईवडील हेच खरे यशाचे मानकरी आहेत असे सानिया आंगचेकर हिनेरामघाटवाडीने एकत्र येऊन जो क्रीडामहोत्सव केला तो एकीचे बळ दाखविणारा आहेअसेच दरवर्षी कार्यक्रम करून महिला व पुरुष यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी मंडळ सातत्याने प्रयत्न करीत असल्याबद्दल संजय गावडे यांनी गौरवोद्गार काढले. माझ्या खेळाची सुरुवात याच मंडळामार्फत झाली आणि माझा सत्कारही हेच मंडळ करते हा माझ्या जीवनातील एक महत्वपूर्ण क्षण असल्याचे जयेश याने नमूद केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात शीतल आंगचेकर म्हणाल्या कीरामघाट कला क्रीडा मंडळ हे १९९५ साली वाडीतील महिला पुरुष व मुले यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी स्थापन केले आहे. विविध स्पर्धांमधून येथील नागरिकांचा मिळत असलेला प्रतिसाद हा एकतेचे प्रतिक आहे. बक्षीस वितरणाचे सूत्रसंचालन सायली आंगचेकरप्रार्थना हळदणकरदिव्या वायंगणकरहेमंत गावडे यांनी तर सूत्रसंचालन डॉ. आनंद बांदेकर व आभार नामदेव सरमळकर यांनी मानले. कै.सुधीर कलिगण प्रस्तुत कलेश्वर दशावतार नाट्य मंडळाच्या अजिक्यतारा भाग-१‘ या नाटकाने महोत्सवाची सांगता झाली.

फोटोओळी – विविध स्पर्धा व क्रिडा स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here