वेंगुर्ला। प्रतिनिधी
तरुण पिढी सक्षम करण्याची जवाबदारी शिक्षकांची आणि सरकारची आहे. जीवनाला दिशा देण्याचे काम शिक्षक करीत असून ,जुनी पेन्शनमधील तांत्रिक आणि आर्थिक बाबींवर काम सुरु असून शिक्षकांच्या प्रश्नांना बगल देण्याचे काम आपले सरकार करणार नाही. आपण पूर्णपणे सकारात्मक असून उपमुख्यमंत्री समवेत शिक्षकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने लक्ष केंद्रित करण्याचे आश्वासन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेंगुर्लेत शिक्षकांनाच्या १७ व्या त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनात दिले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्राच्या-राज्य/
महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे १७ वे त्रैवार्षिक राज्य महाअधिवेशनचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झाले.यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत, स्वागताध्यक्ष तथा शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर,माजी आमदार राजन तेली,ब्रिगेडियर सुधीर सावंत,राज्याध्यक्ष उदय शिंदे , राज्य सरचिटणीस विजय कोंबे,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगांवकर आदीसह जिल्हास्तरीय पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आमदार उदय सामंत,राजन तेली,सुधीर सावंत, यांचे स्वागत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी केले.यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले
वेंगुर्लातील समुद्र किनारा , निसर्ग अतिशय सुंदर
वेंगुर्लातील समुद्र किनारा , निसर्ग अतिशय सुंदर असलेला भाग असून याच ठिकाणी अधिवेशन आयोजित केल्यामुळे इथे पर्यटनही होणार आहे. या अधिवेशनातून शिक्षक चांगलं विचार घेऊन जातील असा विश्वास आहे. गुरु या संकल्पनेला महत्त्व आहे. आईवडीलानंतर गुरुचे स्थान आदराचे आहे. या भावी पिढीवर चांगले विचार, चांगले संस्कार घडवित आहात. जीवनाला दिशा देण्याचे काम आपण शिक्षक करीत आहात. हे सरकार तुमचे आहे. सहा सात महिन्यापूर्वी सामान्य लोकांच्या मनातील सरकार आम्ही स्थापन केले. मी आणि उपमुख्यमंत्री यांनी या राज्यात गेले अनेक निर्णय घेतले. शेतकरी, शिक्षक, कामगार, माताभगिनी आणि विद्यार्थी आहेत. सर्वांना केंद्रबिदू मानून आम्ही निर्णय घेतले. सर्व निर्णय राज्याला तसेच प्रत्येक घटकाला पुढे नेण्यासाठी करत असल्याचे समाधान आहे. आमच्या सभांना असलेली उपस्थिती हीच आमच्या कामाची पोचपावती. शिक्षक ज्ञानदानाचे काम करीत असतो. तुमच्यावर बंधन टाकणार नाहीत आणि टाकू दिली जाणार नाहीत. शिक्षणाचा दर्जा उंचावला पाहिजे, विद्यार्थ्यांचे जीवनमान उंचावला पाहिजे या भावना आहेतच शिक्षकांच्या प्रश्न सोडविण्याची जबाबदारी आमची आहे. सरकारी शाळांवरील विश्वास वाढत चालला असून सरकारी शाळेतील मुलगा चांगला परफॉमर्स करु शकत नाही असं म्हणता येणार नाही.मी सरकारी शाळेत शिकून मुख्यमंत्री झालो. कितीही तंत्रज्ञान आले तरी शिक्षकांची जागा कुणीही घेऊ शकत नाही किवा कुणाला घेता येणार नाही. शिक्षणाची गोडी वाटण्यासाठी विज्ञान, इंग्रजी आणि गणित यांची गोडी वाढण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. राज्यातील सर्व मुलामुलींना समान शिक्षण मिळण्यासाठी निर्णय घेतले आहेत. शिक्षकांची ३० हजार पदे भरणार असून भरतीची पद्धत सोपी करतो आहोत. दुर्गम भागातील अडचणीची जाण मला आहे. बरेच थांबविलेले निर्णय आम्ही घेत असल्याने हे सरकार सर्वांना आपले वाटत आहे.
शालेय शिक्षण मंत्री दिपक केसरकर
सहा महिन्यात केंद्रप्रमुखांच्या रिक्त जागा भरण्यात येतील. तसेच शिक्षकसेवकांच्या पगारात वाढ केली आहे.१०० टक्के विद्यार्थ्यांना गणवेश मिळणार आहेत.शिक्षकांना जनगणना आणि निवडणूक वगळता एकही अशैक्षणिक काम देऊ नये असा जीआर काढलेला आहे. तसेच कमी पटसंख्येच्या शाळा बंद होणार नाहीत. मुख्यमंत्री यांनी ५९० कोटी रुपये टॉयलेट आणि कंपाऊंड वॉल बांधण्यासाठी दिले असल्याची माहिती यावेळी दिली.