Sindhudurg: शिवजयंतीनिमित्त डचवखारीची स्वच्छता

0
103
डच वखार

वेंगुर्ला प्रतिनिधी-शिवजयंतीचे औचित्य साधून जनसेवा प्रतिष्ठानतर्फे वेंगुर्ला येथील डच वखारीची स्वच्छता करण्यात आली. डच वखार येथील कचरा, प्लास्टीक व कांच बाटल्या गोळा करुन तसेच लहान झुडपे कापून स्वच्छता केली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-शिवाजी-महाराजांचा-आदर्/

 या स्वच्छता मोहिमेमध्ये डॉ.संजीव लिंगवत, अनिकेत कुंडगीर पाटील, ओंकार लाड, शुभम तामडे, ऋत्विक पालव, विजय दळवी, गणेश जायभाय, जयसुर्या जामकर, श्रीकृष्ण जानकर, प्रथमेश पाटील, प्रविण पाटील, संतोष सावंत, पियुष हिवाळे, राजेश परब, स्वरुप पाटील यांनी सहभाग घेतला. किल्ल्यांचे संवर्धन व संरक्षण केल्यास पर्यटन वृद्धिगत होऊन शिवरायांचा इतिहास व त्यांचे विचार नवीन पीढिसमोर तेवत राहतील. त्यामुळे गावागावांतील तरूण मंडळीनी किल्ल्यांकडे गांभीर्याने पाहत ते टिकवण्यासाठी स्वच्छता अभियान, डागडुजी अभियान राबविली पाहिजेत असे आवाहन डॉ.संजीव लिंगवत यांनी केले.

फोटोओळी – जनसेवा प्रतिष्ठानतर्फे डच वखारीची स्वच्छता करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here