Sindhudurg: सकल मराठा समाज वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने मोटरसायकल रॅली

0
18
सकल मराठा समाज वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

वेंगुर्ला प्रतिनिधी- सकल मराठा समाज वेंगुर्ला तालुक्याच्यावतीने मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी करण्यात आली. पॉवर हाऊस, रामेश्वर मंदिर, जुने एसटी स्टॅण्ड, दाभोली नाका, कॅम्प मार्गे सातेरी मंदिर अशी काढण्यात आलेली भव्य मोटरसायकल रॅली खास आकर्षण ठरली. यात सुमारे ३५० मोटरसायकलधारकांनी सहभाग घेतला. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-विश्व-मराठी-परिषदेतर्फ/

 त्यानंतर सातेरी मंदिर येथे मराठाचा समाजाचा मेळावा संपन्न झाला. यावेळी समाजाचे अध्यक्ष सिद्धेश परबसचिव राजबा सावंतमहिला संघटनेच्या अध्यक्ष प्रज्ञा परबरामेश्वर देवस्थानचे सचिव रवी परबनर्सरी उद्योजक उमेश येरम यांच्यासह बहुंसख्य मरठा समाज बांधव उपस्थित होते.  या मेळाव्यामध्ये मराठा समाजाील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार करण्यात आला. तसेच शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२मध्ये पाचवी व आठवीमध्ये शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला.

फोटोओळी – मराठा समाजाच्यावतीने घेण्यात आलेल्या मेळाव्याचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here