Sindhudurg: रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत यांच्या शिल्पाचे अनावरण

0
90
मातोश्री पार्वती राऊत यांच्या शिल्पाचे अनावरण

वेंगुर्ला प्रतिनिधी-  विद्या विकास एज्युकेशन सोसायटी,मुंबई संचलित रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयात कै. मातोश्री पार्वती राऊत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या शिल्पाचा अनावरण सोहळा १७ फेब्रुवारी २०२३ रोजी संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष प.म.राऊत यांच्या प्रेरणेने सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी डॉ.मुश्ताक शेख यांच्या हस्ते शिल्प अनावरण करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यातील-भव्य-दश/

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांना या कार्यक्रमास उपस्थिती दर्शविता न आल्याने भ्रमणध्वनीद्वारे कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या आणि शाळेसाठी आवश्यक असणा­या सुविधा उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी ह.भ.प. हरेकृष्ण भगवान पोळजीमाजी आमदार शंकर कांबळीरेडी सरपंच रामसिंग राणेउपसरपंच नमिला नागोळकरग्रा.पं.सदस्यसंस्थेचे चिटणीस डॉ. विनय राऊतडॉ. अनघा राऊतशाळेचे मुख्य सल्लागार एम.पी. मेस्त्रीमुख्याध्यापिका गीता विल्सनश्रीकृष्ण पडवळपंचक्रोशीतील सर्व सरपंचसदस्य व शाळेचे पालक-प्रतिनिधीपालकवर्गशिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

फोटोओळी – रेडी येथील मातोश्री पार्वती राऊत विद्यालयात कै. मातोश्री पार्वती राऊत यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या शिल्पाचे अनावरण करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here