प्रतिनिधी-
वेंगुर्ला – वेंगुर्ला येथे नाटककार मधुसूदन कालेलकर सभागृहात संजिवनी संगीत अकादमी-गोवा आयोजित सुगम संगीत व शास्त्रीय गायन-वादनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जनसेवा प्रतिष्ठान सिधुदुर्गतर्फे भगवती शिक्षण संस्था, नागपूरचे अध्यक्ष विठ्ठलराव मेश्राम यांच्या हस्ते सुप्रसिद्ध गायक डॉ.प्रविण गांवकर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर डॉ.संजीव लिंगवत, प्रकाश नांदोसकर तसेच गायक व वादक उपस्थित हते.
फोटोओळी – सुप्रसिद्ध गायक डॉ.प्रविण गांवकर यांचा विठ्ठलराव मेश्राम यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


