अनंता तुला ते कसे रे स्तवावे । अनंता तुला ते कसे रे नमावे।। अनंत मुखांचा शिणे शेष गाथा। नमस्कार साष्टांग श्रीसाईनाथा।।
प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर
वेंगुर्ले- वेतोरे येथील देऊळवाडीच्या गुरुकृपा उद्योगालयाच्या आवारात श्री साईबाबांच्या मूर्तीची स्थापना २ डिसेंबर २००४ रोजी करण्यात आली साईबाबांचे मंदिर गावात असावे या प्रेरणेने प्रेरीत होऊन कै.आत्माराम तथा प्रभाकर वामन गोगटे यांनी मातीच्या मूर्तीची स्थापना केली. या छोटेखानी मंदीरात दरवर्षी मंदिराचा वर्धापनदिन मोठ्या थाटात संपन्न होत असतो.
गोगटे यांचे मंदिराच्या स्थापनेपासून अवघ्या वर्षभरात १२ डिसेंबर २००५ रोजी आकस्मित निधन झाल्यानंतर अवघ्या तीन महिन्यात फाल्गुन शुद्ध दशमी शके १९२७ गुरुवार दिनांक ९ मार्च २००६रोजी श्री साईबाबांच्या संगमरवरी मूर्तीची स्थापना करण्यात आली. दरवर्षी फाल्गुन शुद्ध दशमी रोजी श्री साईबाबांच्या मंदिराचा वर्धापन दिन उत्सव साजरा करण्यात येतो. या वेळी मूर्ती वर अभिषेक सत्यनारायण महापूजा याशिवाय प्रवचन भजन कीर्तन फुगडी कार्यक्रम खांनोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग असे विविध कार्यक्रम मोठ्या उत्साहात भक्तीमय वातावरणात कार्यक्रम साजरे होत असतात.
श्री साईबाबांच्या मंदिरात उत्सवासाठी वेतोरे गावातील समस्त ग्रामस्थांसहीत सिंधुदुर्ग जिल्ह्याभरातून अनेक साई भक्तांच्या आर्थिक व वस्तू स्वरूपात सहयोग मिळतो. या सहयोगातून हा कार्यक्रम साजरा होतो. वेतोरे साईमंदीराचे एक वैशिष्ट आहे ते म्हणजे सत्यनारायण पुजेसाठी गावातील अथवा गावाबाहेरी कुठल्याही जातीपातीचा धर्माचा विचार न करता साईभक्त जोडप्यांना पुजेला बसण्याचा बहुमान दिला जातो. तसेच साईमंदिरातील आवारात सर्वधर्मीय बांधवाना शुभकार्यासाठी सभामंडपाची उभारणी करण्यात आली असून योग्य दरात सर्वाना विवाहकार्य तसेच विविध शुभ कार्यक्रमासाठी हाॅल उपलब्ध केला आहे. पत्रकार वैभव आत्माराम गोगटे . त्यांचे बंधू पत्रकार विवेक आत्माराम गोगटे या सर्व कार्यक्रमाचे नियोजन वेतोरे ग्रामस्तांच्या व जिल्हातील ,परराज्यातील साईभक्तगणांच्या सहकार्यातून आजवर करीत आले आहेत ते आज तगायत आणि आजचा १७ वा साईमंदिर वर्धापनदिन उत्साहाने संपन्न होत आहे.