वेंगुर्ला प्रतिनिधी- आपण मराठी भाषिक असल्याचा स्वाभिमान बाळगा, व्यवहारात मराठी भाषेचा वापर करा असे आवाहन मराठी भाषा दिनानिमित्त ज्येष्ठ साहित्यिका वृंदा कांबळी यांनी केले.
आनंदयात्री वाङ्मय मंडळ वेंगुर्ला आणि न्यू इंग्लिश स्कूल उभादांडा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा गौरव दिन साजरा करण्यात आला. यावेळी वृंदा कांबळी, प्रा.सचिन परुळकर, अजित राऊळ, महेश राऊळ, पी.के.कुबल, अलका वाळवेकर, वर्षा मोहिते मॅडम, भिसे मॅडम, कुबल मॅडम, अंधारी मॅडम, वैभव खानोलकर आदी उपस्थित होते. न्यू इंग्लिश स्कूल उभादांडाचे मराठीचे शिक्षक बोडेकर यांनी प्रास्ताविकात कुसुमाग्रजांचा जीवनपट उलघडला. अजित राऊळ, पि.के.कुबल, अलका वाळवेकर यांनी मराठीचा महिमा सांगणा-या कविता सादर केल्या. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ज्ञान-पोहचविण्यासाठी-व/
साई मोचेमाडकर याने ‘गे मायभू तुझे मी‘ हे गीत गायन केले, श्रुतिका जुवलेकर यांनी मराठी भाषेची माहिती सांगणारे भाषण आणि स्नेहा वेंगुर्लेकर यांनी ‘कणा‘ ही कविता तर मेघा मयेकर आणि सहकारी यांनी महाराष्ट्र गीत सादर करून मराठी भाषेचा गौरव केला. वसंत बापट यांची ‘केवळ माझ्या सह्यकडा‘ ही प्रदीर्घ कविता वृंदा कांबळी यांनी ओघवत्या भाषेत सादर केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रुती शेवडे तर आभार वर्षा मोहिते यांनी मानले.
फोटोओळी – मराठी भाषा गौरव कार्यक्रमात वृंदा कांबळी यांनी मार्गदर्शन केले.


