वेंगुर्ला प्रतिनिधी- शिरोडा-वेळागरवाडी येथे वेळागर सर्वे नं.३९ नागरिक, जनसेवा प्रतिष्ठान व मातोश्री ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यकर्ते जयप्रकाश चमणकर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसाच्या निमित्ताने कै.सौ.स्मिता जयप्रकाश चमणकर यांच्या स्मरणार्थ मोफत आरोग्य व नेत्र तपासणी शिबिर घेण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ग्रामीण-भागातील-दहावी-व/
शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नागरिक समिर भागत यांच्या हस्ते झाले. उभादांडा सरपंच निलेश चमणकर, बस्तान अल्फान्सो, निल्सन सोज, संतोष भगत, शाम भगत, शेखर भगत, सुधीर भगत, विशाल दुखंडे, उदय भगत, रुपेश तारी, आब्रास मेनास, जेम्स फर्नांडिस, अमोल ठोंबरे, पेद्रु फर्नांडिस, उत्तेज परब, प्रकाश भगत, आग्नेल सोज आदी ग्रामस्थ उपस्थित होते. आरोग्य शिबिरात डॉ.संजीव लिंगवत, डॉ.शिवाजी चव्हाण, डॉ.सई लिंगवत, डॉ.संदीप मेश्राम, डॉ.कुमुद मेश्राम यांनी १८२ रुग्णांची तपासणी करून मोफत औषधोपचार केले. शिबिर यशस्वी करण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विनी सामंत, संजय चव्हाण यांनी विशेष सहकार्य केले.
फोटोओळी – वेळागर येथे रुग्णांची आरोग्य तपासणी करण्यात आली.


