वेंगुर्ला प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हा आणि कुडाळ तालुक्यातील सरंबळ ग्रामस्थ समता संघ मुंबई संचालित ” सरंबळ इंग्लिश स्कुल सरंबळ ” या शाळेचा १० वा माजी विद्यार्थी स्नेहमेळावा मुबई कुर्ला येथे मोठ्या उत्साहात साजरा झाला.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-बचतगटांच्या-उत्पादनां/
जवळपास सात दशकाहून अधिक काळात या शाळेने असंख्य विद्यार्थी घडवले आहेत. मुंबई, पुणे अशा उपनगरातून तसेच गावाहून हे सर्व माजी विद्यार्थी या अविस्मरणीय सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले होते. शाळेची घंटा , राष्ट्रगीत , प्रार्थना, संविधान तसेच बातम्या यामुळे या हॉलला शाळेचे स्वरूपच प्राप्त झाले होते. माजी विद्यार्थ्यांनी केलेली नाटिका, समूहगायन, भावगीते , गुरुजनांनी आणि मान्यवरांनी केलेली मार्गदर्शनपर भाषणे, विद्यार्थ्यांनी शाळा आणि गुरुजनांच्या प्रति व्यक्त केलेल्या भावना यामुळे सर्वचजण काही क्षणांसाठी आपल्या बालपणात हरवून गेले . शाळेचा माजी विद्यार्थी कु केदार टेमकर याने काढलेली रांगोळी सर्वांचेच लक्ष वेधून गेली.
शाळेचे माजी विद्यार्थी आणि मुंबईचे माजी महापौर सन्माननीय दत्ता दळवी साहेब यांनीही वेळात वेळ काढून या स्नेहमेळाव्याला आपली उपस्तिथी दाखवली आणि आपल्या भावनिक शब्दात शाळेचे आणि या सरंबळ गावच्या सातेरी देवीचे आभार मानले. एकंदरीतच प्रेम, जिव्हाळा , मैत्री, धमाल, मजा, मस्ती आणि शाळेच्या प्रति असलेले ऋणानुबंध या सर्व शब्दांना एकत्र गुंफून हा सोहळा सर्व माजी उपस्थित विद्यार्थी आणि मान्यवरांनी आपल्या हृदयात कोरून ठेवला.
या सोहळ्यासाठी या शाळेचे माजी विद्यार्थी श्री अरविंद विश्राम परब यांनी हा हॉल स्वखर्चाने उपलब्ध करून दिला. या कार्यक्रमाची नियोजनबद्ध व्यवस्था सरंबळ इंग्लिश स्कुल माजी विद्यार्थी समिती मुंबई आणि सरंबळ यांनी संयुक्तरित्या उत्तमपणे बजावली.
[…] […]