Sindhudurg: वेंगुर्ले हापूस” ची मार्केट मध्ये वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूया : मनीष दळवी

0
133
वेंगुर्ले हापूस

सिंधुदुर्ग जिल्हा बँक व वेंगुर्ले तालुका खरेदी विक्री संघाचा पाठिंबा; वेंगुर्ला हापूस नावाने दोन लाख डझन आंबा वेंगुर्ला खरेदी विक्री संघ शेतकऱ्यांकडून विकत घेणार

कोकणच्या हापूस आंब्यावर कर्नाटक व आंध्रा मधील आंब्याचे अतिक्रमण; कर्नाटक व आंध्रातील आंबा देवगड आंबा म्हणून विकला जात असल्याची माहिती शेतकऱ्यांनी दिली

वेंगुर्ले : सुरेश। कौलगेकर

वेंगुर्ले तालुक्यात आंबा उत्पादक शेतकरी व आंबा बागायतदार यांची संख्या मोठी आहे. या सर्वांना एकत्र आणण त्यांना तालुका खरेदी विक्री संघाच्या माध्यमातून आणि सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून पाठबळ देणं आणि त्यांचा उत्पादित माल “वेंगुर्ले हापूस” म्हणून मार्केट मध्ये घेऊन जाणे आणि त्याची वेगळी ओळख निर्माण करणे यासाठी हा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत आणि यासाठी दोन लाख डझन आंबा शेतकऱ्यांकडून थेट वेंगुर्ला खरेदी वक्री संघाच्या माध्यमातून विकत घेण्याचा प्रयत्न करून शेतकऱ्यांना थेट फायदा दिला जाणार आहे यावर्षी प्रायोगिक तत्त्वावर खरेदी केल्यानंतर हा प्रयोग संपूर्ण जिल्ह्यात राबविण्याचा संकल्प सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांनी केला आहे.https://sindhudurgsamachar.in/kokan-राज्यस्तरीय-दर्पण-पुरस्/

वेंगुर्ले येथील साई मंगल कार्यालय येथे आज सिंधुदुर्ग जिल्हा बँक व वेंगुर्णी तालुका खरेदी विक्री संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आंबा बागायतदार शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने झाले. यावेळी व्यासपीठावर त्यांच्यासोबत खरेदी विक्री संघाचे चेअरमन ज्ञानेश्वर केळजी, भगीरथ प्रतिष्ठानचे डॉ. प्रसाद देवधर, बागायतदार जीजी साळगावकर, महेश सामंत, प्रकाश गडेकर, नितीन कुबल, यशवंत उर्फ दाजी परब, श्री. नाबर, बाळा  गावडे, जिल्हा बँकेचे अधिकारी  प्रमोद गावडे आदी उपस्थित होते.

सिंधुदुर्गच्या आंब्याची प्रतवारी व दर्जा उत्तम आहे मात्र मुंबई वाशी मार्केट मध्ये आंध्र व कर्नाटकातून कोकणच्या अगोदर आंबा उपलब्ध होतो व आपला आंबा त्यानंतर मार्केटमध्ये जातो या सर्व प्रकारात सिंधुदुर्ग चा आंबा हा मागे पडतो व आंध्र व कर्नाटकातील आंबा देवगड आंबा किंवा सिंधुदुर्ग मधील आंबा म्हणून विकला जातो अशी माहिती जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांनी दिली त्याचबरोबर कॅनिंग साठी कमी दरात आंबा ही कर्नाटक आंध्रा मधूनच स्कॅनिंग कंपन्या विकत घेतात अशी खळबळजनक माहिती मनीष दळवी यांनी दिली

 प्रथम या मेळाव्यामध्ये उपस्थित बागायतदारांनी आपले विषय मांडले. बागायतदारांचे प्रश्न मार्गी लागण्यासाठी आंबा बागायतदार संघ होणे गरजेच आहे  त्या माध्यमातून आपण कॉलिटी बद्दल जागरूकता करू शकतो. नुसता ब्रँड विषय बोलून उपयोग नाही असे सचिन गावडे शिरोडा यांनी सांगितले.

पाल येथील कमलेश गावडे यांनी सांगितले की, बनावट औषधांमुळे बागायतदारांची फसवणूक होते. शासनाने एक ब्रँड औषदांचा तयार करावा. तर योगेश गावडे यांनी आंबा मध्ये या भागातच प्रक्रिया व्हायला पाहिजे तरच फायदा असे मत व्यक्त केले. महेश गावंडे यांनी आंब्यावर वापरण्या योग्य औषधे आहेत त्यावर सापशिडी द्यावी आणि वापरण्या योग्य यादी शासनाने प्रसिद्ध करावी अशी मागणी केली. योगेश परब : पीक विमा योजना बाबत निकष ठरवावे अशी मागणी केली.

तर दरवर्षी या भागात आंबा कॅनिंग मोठे चालतं. मात्र कॅनिंगचा दर ठरवताना यापुढे या भागातील एका बागायतदाराला किंवा जिल्हा बँकेचे अध्यक्ष यांना बरोबर घेऊन दर ठरवावा अशी मागणी बाळू परब यांनी केली सदाशिव आळवे यांनी शासनाने लक्ष घ्यावे बागायतदारांच्या व्यथांकडे लक्ष द्यावे अशी मागणी केली. नितीन कुबल यांनी  सोसायटी यांच्याकडे हवामान मापन यंत्रणा द्यावी अशी मागणी केली. दरम्यान व्यासपीठावरून बोलताना महेश सामंत म्हणाले की, जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे सर्वांना एकत्र करण्याचे हे उपक्रम खरोखरच अभिनंदन आहे. आज संघटित होणे गरजेचे. आंबा बागायतदार वेंगुर्ले ब्रेंड असणे आवश्यक आहे.  आपल्या मालाला हमी भाव हवा असेही त्यांनी सांगितले.

डॉ. प्रसाद देवधर  म्हणाले की,  वातावरणातील बदल अजून दहा वर्षात अजून वाढणार आहे. आपल्या आंबा बागांना संरक्षित पाणी देण्याची व्यवस्था आहे का? आम्ही काय करू शकतो हे ठरवायला पाहिजे. बागायतदारांनी आता धोरणात्मक विचार करायला पाहिजे. यासाठी संघटित बागतदारांची एक कमिटी हवी. शासनाच्या योजनांची माहिती, नियम व अटी यांचा अभ्यास करायला हवा. केवळ अधिकाऱ्यांवर ओरडुन प्रश्न सुटणार नाहीत. संशोधक व विद्यापीठ यांचा समन्वय ठेवून आपल्या मागण्या पूर्ण करून घेता आले पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.

मनिष दळवी आपल्या मार्गदर्शनात पुढे म्हणाले की,वेंगुर्ले आता बदलतोय.. मानसिकता बदलत आहे. अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. कोणीतरी पुढे यायला हवे म्हणून आम्ही हे मेळाव्याचे आयोजन केले आहे. शेतकरी बागायतदारांना पण नफा  मिळाला पाहिजे. माझ्या जिल्हा बँक अध्यक्ष काळात माझ्या शेतकरयाला काही मिळवून देता आले नाही तर माझा उपयोग काय. पक्ष जात पात बाजूला ठेवून आपण संघटित पणे काम करूया. बागायतदारांना आपल्या कडून अपेक्षा आहेत. त्या पूर्ण करण्यासाठी मी नेहमीच प्रयत्न करीन. तालुका खरेदी विक्री संघासह जिल्हा बँक सदैव बागायतदारांच्या मागे उभी आहे.असेही दळवी यांनी सांगितले. आता येथून बाहेर पडताना आम्ही काहीतरी करूया हा उद्देश डोळ्यासमोर ठेऊया. दरम्यान सर्व बागायतरांनी जीआय मानांकन करून घ्यावे. यासाठी लागणारा खर्चामध्ये 75 टक्के खर्च जिल्हा बँक करेल असे आश्वासनही दळवी यांनी दिले. तसेच इतर राज्यात कशा पद्धतीने बागायतदार बागायती करतात याची माहिती घेण्यासाठी अभ्यास दौरा करूया याचाही खर्च आपण उचलू असेही दळवी यांनी आश्वासन दिले. यावेळी आंबा वाहतूकदार जयनु पडवळ, नाथा सावंत यांचा जिल्हा बँकेच्या वतीने सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन विजय रेडकर यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here