Sindhudurg: बुरंबावडे गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

0
47
बुरंबावडे गावात जलजीवन मिशन योजनेच्या कामाचे आ. वैभव नाईक यांच्या हस्ते भूमिपूजन

उपनेते अरुण दुधवडकर यांच्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन अंतर्गत नळयोजनेसाठी ९० लाख रु. निधी मंजूर; बुरंबावडे बौद्धवाडी येथे सरपंच अनुष्का शिंगे यांच्या हस्ते हायमास्टचे उदघाटन

प्रतिनिधी-पांडुशेठ साठम

देवगड – देवगड तालुक्यातील बुरंबावडे गावात नळयोजनेसाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) सिंधुदुर्ग जिल्हा संपर्क प्रमुख,उपनेते अरुण दुधवडकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे जलजीवन मिशन योजनेअंतर्गत ९० लाख रु. निधी मंजूर करण्यात आला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा निधी मंजूर केला आहे. या नळपाणी योजनेचे भूमिपूजन आज कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ले-निवती-समुद्र/

तसेच बुरंबावडे बौद्धवाडी येथे जिल्हा नियोजनच्या दलित वस्ती योजनेअंतर्गत हायमास्ट मंजूर करून तो उभारण्यात आला आहे. त्याचे उदघाटन सरपंच अनुष्का शिंगे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गावच्या वतीने उपनेते अरुण दुधवडकर व आमदार वैभव नाईक यांचा सत्कार करण्यात आला.http://sindhudurg-बुरंबावडे-गावात-जलजीवन

यावेळी फणसगाव विभागप्रमुख दिनेश नारकर, बुरंबावडे सरपंच अनुष्का शिंगे, कणकवली युवासेना उपतालुकाप्रमुख सचिन आचरेकर, सिद्धेश राणे, प्रकाश आडिवरेकर, सत्यवान नार्वेकर, विजय आडिवरेकर, बबन पारकर, नामदेव पाटणकर, रामचंद्र साळवी, जगन्नाथ साळवी ,सायली साळवी, सूर्यकांत साळवी, सूर्यकांत झगडे, रमेश राणम,काशीराम साळवी आदींसह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.

        

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here