Sindhudurg: संतोष दादा नेवाळकर मित्रमंडळातर्फे केंद्र शाळा म्हापण नं. १ शाळेला भरीव मदत

0
36

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

म्हापण- मुंबई स्थित श्री.संतोष दादा नेवाळकर मित्रमंडळाने म्हापण नं. १ शाळेला भेट देऊन शाळेला भरीव असे सहाय्य केले. त्यांनी शाळेला अँड्रॉइड टीव्ही, कलर प्रिंटर, खेळाचे साहित्य, इतर शैक्षणिक साहित्य व विद्यार्थ्यांना खाऊचे वितरण केले.http://sindhudurg-बुरंबावडे-गावात-जलजीवन

संतोष दादा नेवाळकर यांच्या स्मृती प्रित्यर्थ हे मंडळ दरवर्षी काही शाळांची निवड करून सहाय्य करत असते. आपल्या गमावलेल्या मित्राचा वाढदिवस शाळेला मदत करून साजरा करणे हे सामाजिक बांधिलकीचे काम हे मंडळ मागील पाच वर्षांपासून करतात. या प्रसंगी आलेल्या पाहुण्यांनी अतिशय मैत्रीपूर्ण रीतीने विद्यार्थ्यांशी गप्पागोष्टी केल्या. मुलांनी सुद्धा कार्यक्रमाचा मनसोक्त आनंद घेतला. काही पालकांनी सुद्धा कार्यक्रमाला हजेरी लावली. शिवाय मुलांनी तयार केलेल्या विविध शैक्षणिक साहित्यांची पाहणी पाहुण्यांनी केली व त्यांचे कौतुक केले. प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. मेतर गुरूजी यांनी ग्रुपचे आभार मानले.

   

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here