Kokan: रत्नागिरी, सावंतवाडीसाठी चार होळी विशेष गाड्या धावणार!

0
19
कोकण रेल्वेच्या स्थानकात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न गाडीवर अचानक दगडफेक
कोकण रेल्वेच्या स्थानकात मध्यरात्री दरोड्याचा प्रयत्न गाडीवर अचानक दगडफेक

प्रतिनिधी – अभिमन्यू वेंगुर्लेकर

रत्नागिरी- होळीसाठी मुंबईकर चाकरमान्यांना गावी येण्यासाठी मुंबई सीएसएमटी ते रत्नागिरी, रत्नागिरी ते पनवेल, पनवेल ते सावंतवाडी तसेच रत्नागिरी ते लोकमान्य टिळक टर्मिनसदरम्यान धावणार्‍या आणखी एकूण चार विशेष गाड्या रेल्वेकडून जाहीर करण्यात आल्या आहेत. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मराठी-भाषेला-अभिजात-भाष/

या संदर्भात कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार शिमगोत्सवासाठी रेल्वेकडून जाहीर करण्यात आलेल्या विशेष गाड्यांमध्ये मुंबई सीएसएमटी – रत्नागिरी स्पेशल गाडी (01151) मुंबई सीएसएमटी येथून दि. 4 व 7 मार्च 2023 रोजी रात्री 12.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 9 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

रत्नागिरी – मुंबई सीएसएमटी स्पेशल गाडी (01152) रत्नागिरी येथून 6 मार्च 2023 रोजी सकाळी 06:30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी ती दुपारी 13.50 वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल. ही गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डे, आरवली रोड तसेच संगमेश्वर रोड स्थानकावर थांबणार आहे. ही गाडी एकूण 20 डब्यांची धावणार आहे.
दुसरी गाडी गाडी क्र. 01154 रत्नागिरी – पनवेल (01154 ) र मार्गावर धावणार आहे. ही गाडी 4 आणि 7 मार्च 2023 रोजी 10:00 वाजता सुटून त्याच दिवशी 16:20 वाजता पनवेलला पोहोचेल. परतीच्या प्रवासात गाडी क्र. 01153 पनवेल – रत्नागिरी मार्गावर 5 आणि आणि 8 मार्च 2023 रोजी सायंकाळी 6.20 वाजता सुटून दुसर्‍या दिवशी रात्री 12 00:20 वाजता रत्नागिरीला पोहोचेल.

चौथी विशेष गाडी गाडी (01158 ) रत्नागिरी – लोकमान्य टिळक टर्मिनस मार्गावर धावणार आहे. ही गाडी रत्नागिरी येथून 9 मार्च 2023 रोजी सकाळी 6:30 वाजता सुटून त्याच दिवशी ती दुपारी 13:30 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनसला पोहोचेल. ही गाडी संगमेश्वर रोड, आरवली रोड, सावर्डा, चिपळूण, खेड, वीर, माणगाव, रोहा, पनवेल आणि ठाणे स्थानकावर थांबणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here