वेंगुर्ला शिवसेनेचा उपक्रम
वेंगुर्ले प्रतिनिधी
शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या संकल्पनेतून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वच क्षेत्रातील महिलांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने वेंगुर्ले येथे शिवसेना यांच्यावतीने वेंगुर्ले नगरपरिषद स्वच्छता दूत महिला कर्मचारी , महिला शेतकरी व बागायतदार, वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर तसेच महिला विभागातील आरोग्य कर्मचारी ,वेंगुर्ला तालुका कृषी अधिकारी व महिला कर्मचारी त्याचबरोबर वेंगुर्ला पोलीस स्थानकातील महिला पोलीस अधिकारी व कर्मचारी यांचा सन्मान आज करण्यात आला.


वेंगुर्ला येथील शिवसेना यांच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून शहरात व तालुक्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते यावेळी शिवसेना वेंगुर्ला तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर शहर प्रमुख उमेश येरम महिला शहर प्रमुख श्रद्धा परब बाविस्कर महिला विभागीय संघटक सायली आडारकर यांच्यावतीने शहरातील विविध क्षेत्रातील शेतकरी सरकारी कर्मचारी डॉक्टर आरोग्य अधिकारी पोलीस व स्वच्छता दूत नगरपालिका कर्मचारी अशा शंभर महिलांचा सत्कार भेटवस्तू देऊन करण्यात आला. https://sindhudurgsamachar.in/देश-tvs-hlx-खडबडीत-भूप्रदेशांम/
वेंगुर्ला नगरपरिषदेच्या स्वच्छ सुंदर पर्यटन क्षेत्र कंपोस्ट गार्डन येथे नगरपरिषदेच्या कार्यालयीन प्रमुख सौ संगीता कुबल महिला बचत गट विभागाच्या प्रमुख सौ निशा आळवे नगरपालिका स्वच्छता दूत महिला कर्मचारी सेजल जाधव, मेघना धारकर, राजश्री वाडकर ,उमा गोहर, प्रिया गावडे ,किशोरी तुळसकर, वनिता पालकर ,शोभा कांबळे, प्रिया पाटणकर ,उर्मिला जाधव ,रूपाली कोटमेकर, सीमा जाधव आधी उपस्थित होते
वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नाली पवार यांच्यासह आरोग्य महिला अधिकारी पी पी आरावंज सुखदा पेडणेकर संजना मोर्चेमाडकर प्रणाली साळगावकर प्राजक्ता राठोड यासह अन्य महिला कर्मचारी यांचाही सन्मान यावेळी करण्यात आला
भारत देश कृषी प्रधान देश आहे त्यामुळे कृषी क्षेत्रात काम करणाऱ्या शेतकरी महिला बागायतदार यांचा बांधावर जाऊन सन्मान करण्यात आला यामध्ये दिपाली परब अरुणा परब रसिका राऊळ माया राऊळ वृषाली राऊळ सुकन्या जाधव राधिका वारंग सत्यभामा वारंग तेजश्री सावंत शिला जाधव कल्पना सावंत यासह तालुका कृषी अधिकारी हर्षा मॅडम अन्य महिला शेतकऱ्यांचाही भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला
याबरोबरच वेंगुर्ला तालुका कृषी कार्यालय व वेंगुर्ला पोलीस स्थानकातील महिला अधिकारी व कर्मचारी यांचाही सन्मान करण्यात आला शहर प्रमुख उमेश येरम व जिल्हा संघटक सचिन वालावलकर यांच्या संकल्पनेतून आज महिलादिनी शंभर महिलांचा सन्मान करण्यात आला
फोटो ओळी
1 वेंगुर्ला नगरपरिषद स्वच्छता दूत महिला कर्मचारी यांचा महिलादिनी सन्मान करताना वेंगुर्ला शिवसेना पदाधिकारी
2 शेतकऱ्यांच्या बांधांवर महिलादिनी महिला शेतकरी यांचा भेटवस्तू देऊन शिवसेना पदाधिकारी सन्मान करताना
3 वेंगुर्ला उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी डॉक्टर स्वप्नाली पवार व महिला आरोग्य अधिकारी यांचा महिलादिनी सन्मान करताना शिवसेना पदाधिकारी


