वेंगुर्ला प्रतिनिधी- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून प्रि.एम.आर.देसाई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये पालकांसाठी घेतलेल्या पाककला स्पर्धेत वैशाली नाईक, सिद्धी परब व शीतल पांगम यांनी अनुक्रमे प्रथम तीन क्रमांक पटकाविले. हे वर्ष आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष असल्यामुळे नाचणीपासून पदार्थ बनविण्याची स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेचे परिक्षण प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनी केले. यावेळी मुख्याध्यापिका मिताली होडावडेकर, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते. आभार पल्लवी भोगटे हिने केले. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-कराटे-परिक्षेतील-विद्य/
फोटोओळी – पाककला स्पर्धेतील सहभागींना डॉ.धनश्री पाटील यांनी मार्गदर्शन केले.


