Sindhudurg: अभ्यासाबरोबर खेळाची आवड जोपासा – अशोक दाभोलकर

0
45
राष्ट्रीय हॉलीबॉल
राष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर

वेंगुर्ला प्रतिनिधी- शिक्षण व खेळ ह्या दोन नाण्याच्या बाजू आहेत. विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच खेळाची आवड जोपासावी. त्यामुळे शरीरही तंदुरुस्त रहाते असा संदेश राष्ट्रीय हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकर यांनी वार्षिक पारितोषिक वितरण व जिमखाना डे प्रसंगी केले.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिवसेवा-मित्र-मंडळातर्/

      बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण व जिमखाना डे असा संयुक्तिक कार्यक्रम नुकताच संपन्न झाला. यावेळी प्रमुख पाहुणे सुरज साळगांवकरराष्ट्रीय व्हॉलीबॉल पंच अशोक दाभोलकरबी.के.सी.असोसिएशनचे सतिश डुबळेप्राचार्य डॉ.विलास देऊलकरप्रा.डॉ.आनंद बांदेकरकनिष्ठ महाविद्यालय पर्यवेक्षक दिलीप शितोळे उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी अधिक परिश्रम करुन जीवनात यशस्वी व्हावे. महाविद्यालय जीवनात परिश्रम केल्यास पुढील आयुष्य सुखाचे जाईल असे सुरज साळगांवकर यांनी सांगितले. नॅकमध्ये महाविद्यालयाने ‘ मानांकन प्राप्त झाल्याचा मला अभिमान आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या क्षेत्रात गुणवत्ता प्राप्त करुन राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्ज्वल करावे असे आवाहन सतिश डुबळे यांनी केले.

      गेल्या शैक्षणिक वर्षात विशेष गुणवत्ता प्राप्त केलेल्या चैतन्या लाडरुपाली दाभोलकरयोजना नवारवैष्णवी चुडनाईकमंजिरी नार्वेकरपल्लवी कुर्लेकोमल कुडपकरप्रगती गावडेसानिका करंगुटकरसानिका मांजरेकरविद्वत्ता वारंगदिक्षा तोंडवळकरफाल्गुनी नार्वेकरविद्यापिठ पातळीवर क्रिकेट स्पर्धेत विशेष यश प्राप्त केल्याबद्दल पीटर फर्नांडीस यांचा शालश्रीफळ देऊन गौरव करण्यात आला. पीटर फर्नांडीस याला विधाता सावंत व सुरेंद्र खामकर यांनी प्रत्येकी १००१ चे बक्षिस दिले. तसेच बाळकृष्ण परबसुंदर पालवतन्वी दळवीप्रतिक पालवसुनिल काळेओंकार गोसावीदर्शन गडेकरप्रतिक पालवअमोल सावंतमारिया आल्मेडाशामिन फर्नांडीसरिद्धी साळगांवकरगौरी नाईकयासिर मकानदारगुरु गौरव पुरस्कार प्राप्त विणा दिक्षितविद्यापिठाकडून देण्यात येणारा गुणवंत कर्मचारी पुरस्कार प्राप्त संजय पाटीलनॅक समन्वयकप्रा.डी.बी.राणेसहाय्यक प्रा.बी.एम.भैरटप्रा.जे.वाय. नाईकप्रा.हेमंत गावडे यांचाही सत्कार करण्यात आला.

      शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव जयकुमार देसाईचेअरमन डॉ.मंजिरी मोरेपेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई आदींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.धनश्री पाटील यांनीपारितोषिकांचे वाचन वेदिका सावंतक्रिडा संचालक प्रा.जे.वाय.नाईकप्रा.एल.बी.नैताम यांनी तर आभार प्रा.एस.एच.माने यनी मानले.

फोटोओळी – बॅ.खर्डेकर महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here