Maharashtra : नवीन पेन्शनमुळे सरकारचा आणि कर्मचारी यांचा तोटाच भांडवल दरांचा फायदा – अशोकराव जाधव

0
35
शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य
शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य

अध्यक्ष शेतकरी कष्टकरी संघटना महाराष्ट्र राज्य यां प्रसिध्दी पत्रकाव्दारे म्हटले आहे.

देवरुख -सरकारी कर्मचाऱ्यांच्या जुनी पेंशन साठी पुकारलेल्या संपाला पाठींबा देणे साठी मा अशोकराव जाधव अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग प्रदेश काँग्रेस महाराष्ट्र या बाबत संपकरी कर्मचारीयांचे समोर बोलताना म्हणाले की जनतेच्या मनात कर्मचाऱ्यांविरोधात काही लोक चुकीचा संदेश पसरवत आहेत…त्या बाबतीत जनतेचा संभ्रम दूर करणं आवश्यक आहे. कारण कर्मचारी हा फक्त जुनी पेंशनशी या त्यांच्या अस्तित्वाच्या विषयाशी बांधील आहे. काही पक्षाचे आ. टी. सेल कार्यकर्ते जनतेच्या मनात कर्मचाऱ्यांविषयी चुकीची माहिती पसरवून सरकार विरुद्ध कर्मचारी असलेला हा संघर्ष जनता विरुद्ध कर्मचारी असा करण्याचा प्रयत्न करीत आहेत, परंतु सर्वसामान्य जनतेने सर्वप्रथम हा विषय समजून घेणे आवश्यक आहे की पेंशन हा कर्मचाऱ्यांना संविधानाने दिलेला घटनात्मक अधिकार आहे..https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-माजगावात-उद्या-आरोग्य-श/
एवढंच काय तर खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सुद्धा पेंशन चे काही नियम लागू आहेत. उदा- ग्रॅच्युटी … खाजगी कर्मचाऱ्यांना आजही ग्रॅच्युटी मिळते, PF कपात होते त्यांच्या कपात एवढी रक्कम संबंधित कंपनी ला द्यावी लागते… EPFO कडे ही रक्कम जमा होते. ही व्यवस्था खाजगी कर्मचाऱ्यांना पूर्वीपासून दिली जात आहे.

आता मूळ मुद्द्यांवर आपण येऊ-
इथे मुद्दा आहे 2004/05 नंतर नियुक्त सरकारी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या पेंशन चा…तर पूर्वी सांगितल्या प्रमाणे पेंशन हा संविधानाने दिलेला अधिकार असल्याने सरकार कर्मचाऱ्यांना पेंशन बंद करू शकत नव्हती त्यामुळे त्यांनी पेंशन चे स्वरूप बदलवून कर्मचाऱ्यांची पेंशन बंद केली. हे करत असताना नव्या पेंशन मुळे पेंशन खर्च अजिबात कमी झालेला नाही. तर पेंशन ची रक्कम ( कर्मचारी वेतनातून 10% व शासन देते 14% ) अशी ही 24% रक्कम , कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती च्या पहिल्या दिवसा पासून तो सेवानिवृत्त होई पर्यंत या नव्या पी योजनेत NPS मध्ये शेयरमार्केट मध्ये LIC,SBI आणि UTI या तीन कंपन्यात लावली जाते.
ती रक्कम तिथून कोणाकडे जाते हे आपणास वेगळे सांगायला नको.कर्मचारी पुर्वीची जुनी पेंशन योजना मागत आहे म्हणजे काय तर कर्मचारी त्याच्या सेवानिवृत्ती नंतर म्हणजे वयाच्या 58/60 व्या वर्षां नंतर दरमहा 50% पेंशन ची जुनी पेंशन मागत आहे. आज AVG LIFE AGE हे 69.9 वर्षे आहे, म्हणजेच कर्मचाऱ्यांना 9/10 वर्ष 50% देणे योग्य की नव्या पेंशन मध्ये सेवे दरम्यान सतत 38 वर्ष 14% पेंशन देणे योग्य..?
नव्या पेंशन मध्ये केवळ मोठमोठ्या उद्योगपतींचे भले होत आहे, शासन आणि कर्मचारी यांचे दोघांचे ही यात नुकसान च आहे. हे सर्वसामान्य जनतेने समजून घेणे आवश्यक आहे.
आज देशातील सुरक्षाबला च्या जवानांना पेंशन नाहीय.
1) BSF ❌ पेंशन (जुनी पेंशन) नाही..
2) CRPF ❌ पेंशन नाही ..
3) ITBP ❌ पेंशन नाही
4) NSG ❌ पेंशन नाही
5) NDRF ❌ पेंशन नाही
6) पोलीस ❌पेंशन नाही
7) कर्मचारी ❌ पेंशन नाही
8) शिक्षक ❌ पेंशन नाही
9)सफाई कामगार ❌पेंशन नाही
आपल्याला वाटते का की यातील वरील सुरक्षा दलाची लोकं सुद्धा पेंशन साठी लायक नाहीय असे जनतेला वाटते काय? आमचे मत सुरक्षा रक्षक अगदी पोलीस दला सकट सर्वांना पेन्शन मिळालीच पाहिजे असे प्रतिपादन अशोकराव जाधव यांनी केले.
आज देशाच्या अर्धसैनिक जवानांना पेंशन नाहीय मात्र तर मग पेंशन म्हणजे जुनी पेंशन कोणाला आहे.
1) आमदार – खासदार – (राज्यसभा/लोकसभा) मुख्यमंत्री _ राज्यपाल _ प्रधानमंत्री_ राष्ट्रपती
यात पेंशन साठी त्यांना वयाची अट नाही, 27 व्या वर्षी माजी झालेला कोणताही माजी आमदार/खासदार फुल पेंशन वयाच्या 27 व्या वर्षा पासून आजीवन घेतो, त्याच्या नंतर त्याची पत्नी/ मुले हे घेतात.माजी आमदार जर खासदार बनला तर तो आमदारकी ची पेंशन व खासदारकी चे वेतन घेतात
जर तो राज्यसभा खासदार वर गेला तर आधीच्या 2 व राज्यसभेची 1 अश्या 3 पेंशन घेतो.. राज्यपाल बनला तर 4 थी पेंशन , तोच राष्ट्रपती बनला तर 5 वी, no लिमिट
2) तसेच देशातील ज्युडिशरी ने (2005 नंतर नियुक्त न्यायाधीश यांना) स्वतः ला जुनी पेंशन लागू करून घेतली आहे. आज सर्व उच्च / सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश , जिल्हा तालुका न्यायाधीश यांना जुनीच पेंशन आहे.
मित्रांनो सर्वसामान्य शेतकरी / मजूर / कुटुंबातील मुलगाच आज सरकारी सेवेत पोलीस , लिपिक , शिक्षक , इत्यादी सेवेत आहे.. त्यामुळे त्यांना विरोध करणाऱ्यानी या सर्व बाबी व सर्व आर्थिक गणित समजून घ्या.. कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेंशन बाबत च्या नावाने आज जनतेत कर्मचाऱ्यांविरोधात जे चुकीचे नेरेटीव्ह सेट केले जात आहे ते चुकीचे आहे, जनतेने सत्य जाणून घेतले पाहिजे, नव्या पेंशन च्या रूपाने उद्योगपतीचे होत असलेले भले थांबले पाहिजे.. त्यासाठी देखील जुनी पेंशन आवश्यक आहे..या सर्वाचा विचार करूनच देशात काँग्रेस ची राज्य असलेल्या राज्यात जुनी पेन्शन लागू केली आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here