मुंबई- बोरीवली येथील मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट कोर्टात काम करणारे एड. पृथ्वीराज झाला हे कांदिवली पोलिस स्टेशनमध्ये एका प्र्करणात चर्चा करण्यासाठी गेले असता सहायक पोलिस निरीक्षक (एपीआय) अनंत गीते यांच्याशी वाद झाल्यानंतर त्यांना मारहाण केली. या अगोदर देखील पोलिसांकडून किंवा इतर लोकांकडून काम करताना मारहाणीच्या काही घटना झाल्या आहेत. या मुळे सर्व वकील वर्तुळात अधिवक्ता (संरक्षण ) विधेयक लागू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-नागपूर-खंडपीठाचे-मुख्य
ही घटना प्रकाशात आल्यापासुन मुंबई- ठाणे भागातील सर्व न्यायलयांमद्धे कार्यरत वकील संघटना व बार असोसिएशन्स कडून तीव्र नाराजी व्यक्त केली गेली आहे. पोलिस अधिकार्यावर झालेल्या मारहाणीविरोधात वांद्रे बार असोसिएशन, कल्याण जिल्हा न्यायालय वकील संघटना, मुंबई दिवाणी व सत्र न्यायालय न्यायालय बार असोसिएशन, लघु वाद न्यायालय वकील एसोसिएशन, अंधेरी बार असोसिएशन, दादर एड्वोकेट्स बार असोसिएशन, एफसीबीए, मुंबई, कुर्ला कोर्ट वकील संघटना आदि वकिलांच्या संघटनांनी शुक्रवारी न्यायलयीन कामाचा बहिष्कार किंवा अनेक ठिकाणी काळ्या फिती लावून काम करण्याचे आवाहन केले आहे. सर्व ठिकाणी वकिलांकडून या मुद्द्याला मोठा प्रतिसाद मिळत आहे आणि स्वफुर्तीने विरोध चालू झालं आहे. काही ठिकाणी पुढील आठवण्यात या मुद्दयावर आंदोलंनांचा नियोजन करण्यात येत आहे.


अंधेरी कोर्ट बार असोसिएशन, कुर्ला कोर्ट बार असोसिएशन तर्फे तिकडच्या न्यायालयांमद्धे काम बंद पाडून कारवाईसाठी मागणी करण्यात आली. कोर्ट परिसरातील बहुतांश वकील त्यात सहभागी झालेत. एआयएलयू, सदर मुद्द्यावर सर्व वकील आणि न्यायालयांत कार्यरत वकील संघटनांना एकत्र येऊन वकील संरक्षण कायदा लागू करणे आणि हिंसाचार करणार्या पोलिस अधिकार्यावर गुन्हा नोंद करण्याकरिता लढा तीव्र करण्याचे आवाहन केले आहे.


