हिंदू नववर्षाच्या पूर्व संध्येस त्या गरीब गरजू अधू माणसाचा घरचा वीज पुरवठा खंडित

0
51
महावितरण
गरीब वीजग्राहकांना २५ वर्षे मोफत वीज

अर्धांगवायूमुळे शाररिक हालचाल होतनसल्याने पेंशंन्ट अंथरूणात खिळून ; माड्याचीवाडी येथील करमळगाळूवाडीत घडला हा प्रकार

कुडाळ– माड्याचीवाडी ग्रामपंचायत हद्दीतील करमळगाळू वाडी मधील श्री भास्कर अनंत डीचोलकर हे गृहस्थ गेली सातवर्षे परलीसिस (अर्धांगवायू)ने अंथरुणावर खिळून आहेत. मुलगा नोकरी संभाळून त्यांची सेवा औषध उपचार करीत असतो. त्यामुळे आर्थीक अडचणीमुळे विजबिल भरायचे राहीले तरी पुढील दोन दिवसाची मुदत द्या मुलगा पाडव्याला येणार आहे तो बिल भरणार आहे तरी दोन दिवस थांबा मी शाररिक दृष्ट्या पंगू असून मला अंधारात ठेवून का अशी विनंती करूनही विजवितरणच्या कर्मचार्यानी त्यांच्या घराच्या वीज बीलापैकी अवघ्या 2300 रुपयासांठी हूमरमळा वीज वितरणाच्या महिला अधिकाऱ्याने हिंदू नववर्षाच्या पूर्व संध्येस त्या गरीब गरजू अधू माणसाचा घरचा वीज पुरवठा खंडित केला आहे.https://sindhudurgsamachar.in/ratnagiri-घुबड-पक्षीला-दिले-जीवदा/

सदर कुटुंबातील कमावता मुलगा देवगड येथे कामाला गेला होता त्याने उद्या आपण येवून वीज बील भरतो असे सांगून देखील सदर महिला अधिकाऱ्याने आपल्या अधिकाराचा दुरुपयोग करून वीज तोडली तेही नववर्षाच्या पुर्वसंधेला खर तर एवढ कठोर वागण्याची गरज खरोखरच होती काय ? दोन दिवस थांबून प्रतिक्षा केली असती तर चालले नसते काय? दोन दिवस तेेही हिंदुनववर्षाच्या सणाला त्या अपंग माणसाला अंधारात ठेवून काय मिळवल ? जनमानसात या घटनेमुळे संबधित महिला अधिकारीच्या मनमानी कारभार विषयी संताप व्याक्त होत आहे. या प्रकरणी सर्व चौकशी व्हावी असे गावकऱ्यांचे मत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here