Sindhudurg: वेंगुर्ल्यात शोभायात्रेने हिदू नविन वर्षाचे स्वागत

1
174
वेंगुर्ल्यात शोभायात्रेने हिदू नविन वर्षाचे स्वागत
वेंगुर्ल्यात शोभायात्रेने हिदू नविन वर्षाचे स्वागत

वेंगुर्ला प्रतिनिधी

वेंगुर्ला प्रतिनिधी- पारंपारिक वेशभूषा, टाळ मृदुंगाचा गजर, लेझिम नृत्य, झांजांचे वादन आणि ढोल ताशांच्या निनादात वेंगुर्ला शहरात आज शोभायात्रा काढून हिदू नववर्षाचे उत्साहात स्वागत करण्यात आले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-सर्वस्तर/

वेंगुर्ल्यात शोभायात्रेने हिदू नविन वर्षाचे स्वागत

चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून मराठी नववर्षाला प्रारंभ झाला असून या नववर्षाचे स्वागत करण्यासाठी हिदू धर्माभिमानी मंडळी यांनी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रेचे आयोजन केले होते. या यात्रेत शेकडो हिदू धर्माभिमानी सहभागी झाले होते. नूतन वर्ष सर्वांना सुख, समृद्धीचे जावो, रोगाराई नष्ट होवो यासाठी प्रारंभी ग्रामदैवत श्री देव रामेश्वराला श्रीफळ ठेवण्यात आले. त्यानंतर या स्वागतयात्रेला सुरुवात झाली. श्री रामेश्वर मंदिराकडून निघालेली ही स्वागतयात्रा शिरोडा नाका, दाभोली नाका, बाजारपेठ, मारुती स्टॉप मार्गे पुन्हा रामेश्वर मंदिर येथे यात्रेची सांगता झाली. या स्वागतयात्रेत वारकरी भजन, वेंगुर्ला हायस्कूलचे लेझिम पथक, झांज पथक यांच्यासह बहुसंख्य नागरिक सहभागी झाले होते. यावेळी सर्वांनी एकमेकांना नविन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. 

फोटोओळी – नववर्षाच्या स्वागतासाठी वेंगुर्ला शहरात स्वागतयात्रा काढण्यात आली.

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- सिधुदुर्ग जिल्ह्याबरोबरच वेंगुर्ला तालुक्यातही घरोघरी गुढी उभारुन मराठी नविन वर्षाचे स्वागत करण्यात आले. http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ल्यात-शोभायात्/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here