कपडे तयार करण्यासाठी लागणाऱ्या रसायनाचे ड्रम घेऊन जाणारा ट्रक कशेडी घाटात पलटी झाला या अपघातात चालक जखमी झाला आहे.सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही पण मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली आहे.सुरज चंद्रकांत शेडगे (30) हा चालक जखमी झाला आहे.
सकाळी 8:15 वाजण्याच्या सुमारास तो कशेडी घाट उतरत असताना आंबा स्टॉपजवळील एका अवघड वळणावर त्याचा ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक रस्त्यात पलटी झाला. या अपघातात ट्रकमधील रसायनाने भरलेले ड्रम रस्त्यावर पडून फुटल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. या अपघातात जखमी झालेला चालक शेडगे याला तात्काळ रुग्णवाहिकेने कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवून दिले