Sindhudurg: मदर तेरेसा स्कूलमध्ये पदवीप्रदानाने मुले सुखावली

1
232
मदर तेरेसा स्कूलमध्ये पदवीप्रदानाने मुले सुखावली
मदर तेरेसा स्कूलमध्ये पदवीप्रदानाने मुले सुखावली

वेंगुर्ला प्रतिनिधी-विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यास शिक्षक मोलाची भूमिका बजावत असल्याचे प्रतिपादन अलौकिका झांटये यांनी पदवीदान कार्यक्रमावेळी केले.

वेंगुर्ला येथील मदर तेरेसा स्कूलमध्ये २५ मार्च रोजी पदवी दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी शाळेचे व्यवस्थापक व चर्चचे धर्मगुरु फादर अॅण्ड्यू डिमेलो, सिस्टर किरण, सिस्टर मार्गारेट, पालक प्रतिनिधी साक्षी मोचेमाडकर आदी व्यासपिठावर उपस्थित होते. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-शिवसेना-फोडल्यामुळे-नि/

यावेळी स्कूलमधील सिनिअर के.जी.वर्गातील मुलांना पदवीदान पोशाख परिधान करुन त्यांना प्रमाणपत्र, पुष्प व टोपी देऊन गौरव करण्यात आला. याप्रसंगी विविध सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांचे आयोजन केले होते. यात छोट्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन कार्यक्रमांची रंगत वाढवली. मुलांनी सादर केलेल्या विविध कलांचे कौतुक करुन अलौकिका झांटये शुभेच्छा दिल्या. शाळेची माजी विद्यार्थीनी डॉ.अॅलिस डिसोजा हिचा मुख्याध्यापकांतर्फे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. प्रशालेचे मुख्याध्यापक फादर अॅन्थोनी डिसोजा, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचा-यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम यशस्वीपणे संपन्न झाला.

फोटोओळी – सिनिअर के.जी.वर्गातील मुलांना पदवी प्रदान करण्यात आली.

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला येथील प्रादेशिक फळ संशोधन केंद्र व परबवाडा ग्रामपंचायत तसेच शासनाचा कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने परबवाडा येथे काजू लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण घेण्यात आले.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-मदर-तेरेसा-स्कूलमध्ये… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here