Sindhudurg: वेंगुर्ला शहरात उत्साहात रामनवमी साजरी

रामनवमी

1
33
वेंगुर्ला शहरात उत्साहात रामनवमी साजरी
वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात आकर्षक राम सीतेची पूजा बांधण्यात आली.

वेंगुर्ला प्रतिनिधी – वेंगुर्ला तालुक्यातील ठिकठिकाणच्या मंदिरांमध्ये गुरुवारी भक्तिमय वातावरणात रामनवमी उत्सव साजरा करण्यात आला. श्रीरामाच्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला.

ग्रामदैवत श्री रामेश्वर मंदिर परिसरात असलेल्या राम मंदिरात रामसीतेची आकर्षक पूजा बांधण्यात आली. ११ वाजता ह.भ.प.अरुणबुवा सावंत यांचे रामजन्माचे कीर्तन झाले. त्यानंतर रामजन्म होऊन श्रीरामाची पालखीतून भजनासहीत प्रदक्षिणा काढण्यात आली. दुपारी १ वाजता आरती होऊन उपस्थितांना प्रसाद वाटण्यात आला. मारुती स्टॉप येथील हनुमान मंदिरात ह.भ.प.अवधुत बुवा नाईक यांचे राजन्माचे कीर्तन होऊन रामजन्म करण्यात आला. सायंकाळी भजन आणि आरतीने उत्सवाची सांगता झाली.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-स्तोत्र-पाठांतर-स्पर्ध/

 तर शहरातील भाऊ मंत्री यांच्या राममंदिरातकुबलवाडा येथील राम व मारुती मंदिरातरहाटाच्या विहिरीकडील मारुती मंदिरात रामजन्म करण्यात आला.

फोटोओळी – वेंगुर्ल्याचे ग्रामदैवत श्रीदेव रामेश्वर मंदिर परिसरातील राम मंदिरात आकर्षक राम सीतेची पूजा बांधण्यात आली.

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी – स्वच्छ सर्वेक्षणमध्ये वेंगुर्ला शहर हे देशपातळीवर झळकल्या नंतर याच पुढचं पाऊल म्हणून आपण पर्यावरण संवर्धन व संरक्षणाकरिता कांदळवन व विविध ठिकाणी स्वछता मोहीम, जनजागृती कार्यक्रम आयोजित करत आहोत. त्यामुळे वेंगुर्ला शहर पुन्हा एकदा अव्वल ठरेल अशी प्रतिक्रिया मुख्याधिकारी परितोष कंकाळ यांनी स्वच्छतोत्सव कार्यक्रमात बोलताना व्यक्त केली. https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-वेंगुर्ला-शहरात-उत्साह/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here