गोवा टॅक्सी संघटनेचा डिजिटल भाडे मीटरच्या सक्तीला विरोध

0
105

गोव्यामध्ये टॅक्सींना डिजिटल भाडे मीटर बसवण्यासाठी आज बोलाविण्यात आले होते. पण टॅक्सीसंघटनेने या सक्तीच्या भाडे मीटर बसवण्यासाठीच्या निर्णयाला विरोध दर्शविला आहे.वाहतूक विभागाने सर्व टॅक्सींना डिजिटल मीटर बसवण्यासाठी गुरुवारी अंमल बजावणी केली होती. पण कुणीही टॅक्सीचालक या विभागाकडे फिरकला नाही. गोव्यामध्ये टॅक्सीचालकांचे दोन गट आहेत.

या दोन्ही गटांनी म्हणजेच एक नॉर्थ गोवा आणि दुसरा साऊथ गोवाच्या संघटनेने जनता हाऊस,पणजी येथील वाहतूक विभागाच्या मुख्य कार्यालयाला भेट देऊन आपल्या तक्रारी मांडल्या आणि डिजिटल मीटर बसविण्याची सक्ती पुढे ढकलावी असे सांगितले.यासाठी कारण देताना त्यांनी पहिल्यांदा टॅक्सीचे कमाल आणि किमान भाडे दर प्रस्थापित करावेत. त्याशिवाय आमच्या अनेक मागण्या आणि अडचणी आहेत त्या आधी पूर्ण कराव्यात.

तसेच वाहतूक विभागाने आमच्याशी यावर चर्चा करावी असे टॅक्सी संघटनेचे सुनीला नाईक यांनी सांगितले.त्याशियाय कोरोनाच्या या महामारीत कुणीही पर्यटक नाहीत,आधीच चाललेली टाळेबंदी त्यामुळे सर्वजण घरातच आहेत.कुणाच्याही हाताला काम नाही. त्याशिवाय त्यांनी अँप बेस्ड टॅक्सी सेर्वीची बंद करावी अशी मागणी बाप्पा कोरगावकर यांनी केली.परंतु या सर्वांना उत्तर देताना वाहतूक विभाग संचालक राजन सातार्डेकर यांनी हे आदेश हायकोर्ट कडून आले आहेत आणि त्याचे पालन करने आवश्यक आहे असे सांगितले.

2People Reached0EngagementsBoost PostLikeCommentShare

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here