Sindhudurg: कलर्स मराठीवरील ‘तात्यांचा‘ वेंगुर्ल्यात सत्कार

0
85
कलर्स मराठीवरील ‘तात्यांचा‘  वेंगुर्ल्यात सत्कार
तात्यांच्या‘ उत्कृष्ट भुमिकेसाठी अॅवॉर्ड मिळालेले अभिनेते अतुल महाजन यांचा रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.

वेंगुर्ला प्रतिनिधी- कलर्स मराठी चॅनलवरील ‘भाग्य दिले तू मला‘ या मालिकेतील ‘तात्यांच्या‘ उत्कृष्ट भुमिकेसाठी वेंगुल्याचे सुपूत्र अमोल उर्फ अतुल महाजन यांना अॅवॉर्ड मिळाला आहे. त्याबद्दल वेंगुर्ला येथील श्री रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.https://sindhudurgsamachar.in/kolhapur-ऊर्जा-सुरक्षेचा-सल्ला/

कैरी‘ चित्रपटाचे चित्रिकरण नुकतेच उभादांडा-वरचेमाडवाडी येथे  घेण्यात आले. या चित्रपटाच्या निमित्ताने अभिनेते अमोल महाजन वेंगुर्ला या आपल्या मूळ गावी आले होते. बुधवारी (दि.५) रामेश्वर मंदिरात महाजन यांची वार्षिक जागर पालखी सेवा असल्याने अमोल महाजन हे यावेळी उपस्थित राहून पालखी सोहळ्यात सहभागी झाले. यानंतर रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रविद्र परबआमा परबविजय गुरवनिखिल घोटगेविनय गोगटेभैय्या गुरवअभिजित महाजनउदय महाजन यांच्यासह महाजन परिवार उपस्थित होता.

फोटोओळी – तात्यांच्या‘ उत्कृष्ट भुमिकेसाठी अॅवॉर्ड मिळालेले अभिनेते अतुल महाजन यांचा रामेश्वर देवस्थान ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here