Maharashtr: ग्रीनलाईनतर्फे अल्ट्राटेक सिमेंटच्या पुणे बल्क टर्मिनलमध्ये त्यांचे एलएनजीवर चालणारे ट्रक तैनात

0
106
ग्रीनलाईनतर्फे अल्ट्राटेक सिमेंटच्या पुणे बल्क टर्मिनलमध्ये त्यांचे एलएनजीवर चालणारे ट्रक तैनात
ग्रीनलाईनतर्फे अल्ट्राटेक सिमेंटच्या पुणे बल्क टर्मिनलमध्ये त्यांचे एलएनजीवर चालणारे ट्रक तैनात

शाश्वत, हरित दळणवळण उपायांद्वारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या कार्यात अल्ट्राटेक भागीदार

पुणे ३: भारतातील पहिली आणि एकमेव एलएनजी इंधन असलेली हेवी ट्रकिंग लॉजिस्टिक कंपनी ग्रीनलाईन (ग्रीन प्लॅनेट लॉजीस्टीक्स प्रायव्हेट लिमिटेड) ने महाराष्ट्रातील पुणे येथे स्थित अल्ट्राटेक सिमेंटच्या बल्क टर्मिनलवर त्यांचे एलएनजी वर चालणारे ट्रक तैनात करण्याची घोषणा केली आहे.

नागपूरजवळील अवरपूर सिमेंट वर्क्स येथे पहिला ट्रकचा ताफा सादर झाल्यानंतर ग्रीनलाइनच्या एलएनजी वर चालणाऱ्या ट्रकच्या या दुसर्‍या ताफ्यासह अल्ट्राटेक आपल्या कामकाजातील शाश्वतता आणि कार्बन उत्सर्जन कमी करण्याप्रती असलेल्या बांधिलकीमध्ये प्रगती करत आहे. एलएनजी ट्रकचा वापर हे कंपनीचे शाश्वत लक्ष्य साध्य करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हा विकास अल्ट्राटेकची येत्या काही महिन्यांत देशभरातील त्याच्या प्रकल्पांमध्ये एलएनजी ताफा वाढवण्याची वचनबद्धता अधोरेखित करतो.

या ट्रक्सना अल्ट्राटेक सिमेंटचे एव्हीपी लॉजिस्टिक्स श्री. तन्मय प्रधान, अल्ट्राटेक पुणे बल्क टर्मिनलच्या प्रकल्प प्रमुख सुश्री निशा जैन यांच्यासह ग्रीनलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. आनंद मिमाणी आणि इतर प्रमुख अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवला. https://sindhudurgsamachar.in/kolhapur-ऊर्जा-सुरक्षेचा-सल्ला/

या सहयोगाबद्दल बोलताना अल्ट्राटेक सिमेंटचे एव्हीपी लॉजिस्टिक्स श्री. तन्मय प्रधान म्हणाले,”अल्ट्राटेकमध्ये आम्ही शाश्वत भविष्य निर्माण करण्यासाठी समर्पित आहोत आणि स्वच्छ पर्यावरणाचे आमचे ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही आमच्या भागीदार आणि भागधारकांसोबत सहकार्य करण्यास पूर्णपणे वचनबद्ध आहोत. ग्रीनलाईन सोबतचा सहयोग हे उत्सर्जन कमी करण्यासाठी, ऊर्जा कार्यक्षमता वाढवण्यासाठी आणि शाश्वततेला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या सुरू असलेल्या प्रयत्नांच्या दिशेने पुढे टाकलेले एक पाऊल आहे.”

ग्रीनलाइनचे एलएनजीवर चालणारे ट्रक पारंपरिक डिझेल ट्रकच्या तुलनेत कार्बनडाय ऑक्साइड  उत्सर्जन २८% ने कमी करतात. त्यामुळे दर वर्षी प्रति ट्रक २४ टन कार्बनडाय ऑक्साइड  उत्सर्जन कमी होते. जोडीला हे एलएनजी ट्रक इतर धोकादायक उत्सर्जन जसे की SOx उत्सर्जन १००% पर्यंत, NOx उत्सर्जन ५९% पर्यंत आणि पार्टिक्युलेट मॅटर ९१% पर्यंत लक्षणीयरीत्या कमी करतात.

या प्रसंगी बोलताना ग्रीनलाइनचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद मिमाणी म्हणाले,”अल्ट्राटेक सिमेंटसाठी त्यांच्या जड ट्रकमधून होणारे कार्बन उत्सर्जन कमी करण्याच्या प्रयत्नात ग्रीन मोबिलिटी पार्टनर म्हणून पुन्हा एकदा आमची निवड झाल्याचा आम्हाला अभिमान वाटतो. रस्त्यावरील दळणवळणामधून होणारे विषारी, प्रदूषित उत्सर्जन कमी करणे व्यवसायांसाठी महत्त्वपूर्ण आहे आणि ग्रीनलाइन आपल्या एलएनजी चालित हेवी-ड्युटी ट्रकच्या ताफ्याद्वारे या प्रयत्नात महामंडळांना सक्रियपणे पाठिंबा देत आहे.”

हरित दळणवळण हे ग्रीनलाइनचे उद्दिष्ट आहे आणि एलएनजी इंधन असलेल्या लांब पल्ल्याच्या ट्रक्सच्या वापराचे कॉर्पोरेट्ससाठी होणारे प्रचंड फायदे दर्शवून त्याचा व्यापक अवलंब करण्याचा मार्ग खुला करत आहे. भारतात एलएनजी ट्रकिंगला वास्तवात आणण्यासाठी ग्रीनलाइनने भारतातील पहिली आणि एकमेव एकात्मिक हरित दळणवळण परिसंस्था तयार करण्याकरता अनेक संस्थांसोबत सहयोगकेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here