कुडाळ- आंदुर्ले गावात बीएसएनल टाॕवर असुनही नेटवर्क नाही येत नाही त्यामुळे संदर्भात कुडाळ मुख्य BSNL कार्यालय येथे संतप्त ग्रामस्थांतर्फे निवेदन देण्यात आले. बी एस एन एल ची सेवा पुर्ववत आणि अखंडित करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे .https://sindhudurgsamachar.in/kokan-मुंबई-गोवा-महामार्गावरी/
मागील काही दिवसांपासून आंदुर्ले गावात जीओचाही टाॅवर उभारणीचे काम चालू होते परंतु आता तेही काम तात्काळले आहे. त्यातच बी एस एन एल ची सेवाही बंद झाली आहे.तसेच मोबाईल रेंज आणि इंटरनेट सेवा सुध्दा व्यवस्थित कार्यरत नसल्यामुळे आंदुर्ले वासियांना संपर्कादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. गरज असताना आणि बी एस एन एल चा टाॅवर असतानाही सरकारची सेवा बंद झाल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. जास्तीत जास्त ग्राहक जोओ कडे ओढावा या अनुषंघाने दुरसंचार निगम असे वागत असावे असे ग्रामस्थांमध्ये गृहीत धरले जात आहे आणि त्यामुळेच आंदुर्ले गावातील BSNL टाॕवर वारंवार बंद पडत आहे अशा अटकळी बांधल्या जात आहेत.
याबाबत अधिकारी श्री. अरविंद पाटील व श्री. बलवंत सिंग यांच्या बरोबर सविस्तर चर्चा करण्यात आली. त्यांनी OFC केबल आणि टाॕवर परिक्षेत्रात काही तांत्रिक कारणांमुळे समस्या उद्भवत आहेत असे समजते. यासंदर्भात BSNL मार्फत लवकरच कर्मचारी प्रत्यक्ष ठिकाणी पाठवण्यात येणार आहे ते पाहणी करून उदभवणार्या अडचणी व तांत्रिक बाबी सोडविण्याचे आश्वासन दिले.
यावेळी निवेदन दैताना आंदुर्ले गावच्या माजी सरपंच सौ. पुजा विश्वजीत सर्वेकर, श्री. वसंत कोनकर, श्री. अरूण तांडेल,श्री. सतिश परब, श्री. अजित सर्वेकर, श्री. आनंद परब उपस्थित होते.