Sindhudurg : सातार्डेकरवाडी येथील टाकी चोरी प्रकारणी अधिका-यांची चौकशी न झाल्यास उपोषण

0
25
Sindhudurg : सातार्डेकरवाडी येथील टाकी चोरी प्रकारणी अधिका-यांची चौकशी न झाल्यास उपोषण
Sindhudurg : सातार्डेकरवाडी येथील टाकी चोरी प्रकारणी अधिका-यांची चौकशी न झाल्यास उपोषण

वेंगुर्ला प्रतिनिधी- वायंगणी गावातील सातार्डेकरवाडी येथील लघू नळपाणी योजनेच्या पाण्याची टाकी चोरणा-यावर पोलीस स्टेशनला रितस गुन्हा दाखल करून या प्रकाराला पाठीशी घालणा-या अधिका-यांची ३० एप्रिल पर्यंत चौकशी न झाल्यास १ मे महाराष्ट्र दिनी पंचायत समिती कार्यालयासमोर बेमुदत उपोषण छेडण्याचा इशारा येथील सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सातार्डेकर व भिकाजी गावडे यांनी वेंगुर्ला पंचायत समितीच्या गटविकास अधिका-यांना लेखी निवेदनाद्वारे दिला आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-महाराष्ट्र-भूषण-पुरस्क/

 वायंगणी ग्रामपंचायतकडून आवेरेधनगरवाडी-सातार्डेकरवाडी येथील लोकांची पाण्याची गैरसोय दूर व्हावी याकरिता सन २०१७/२०१८ मध्ये चौदाव्या वित्त आयोगातून शासनाचा लाखो रुपये निधी खर्च करून लघू नळ पाणी योजना कार्यान्वित करण्यात आली होती. या नळ पाणी योजनेच्या पाण्याची टाकी सातार्डेकरवाडी येथे बसविण्यात आली होती. ही टाकी चोरीस गेल्याबाबत ३ मार्च २०२३ रोजी वायंगणी ग्रामपंचायतीचे प्रशासक यांचे जवळ लेखी अर्ज देऊन याप्रकरणी कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती. परंतु सदर अर्ज देऊन एक महिन्याचा कालावधी पूर्ण झाला असला तरी आमच्या अर्जाची कोणतीही दखल घेतलेली नसल्याने याप्रकरणी उपोषण छेडून आपल्याकडे न्याय मागण्याचा मार्ग पत्करावा लागत आहे. तरी ३० एप्रिलपर्यंत या शासकीय मालमत्तेच्या चोरी प्रकरणी आपल्याकडून पोलीस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात यावा व या प्रकरणात पाठीशी घालणा-या अधिका-यांची योग्य ती चौकशी करण्यात यावी अन्यथ १ मे महाराष्ट्र दिन वेंगुर्ला पंचायत समितीसमोर बेमुदत उपोषण छेडून आपले लक्ष वेधून घ्यावे लागतील. तरी तात्काळ गुन्हा दाखल करून या प्रकाराला पाठीशी घालणा-या संबंधित अधिका-यांची चौकशी करून न्याय मिळावा असे गटविकास अधिकारी यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

फोटोओळी – गट विकास अधिकारी सामाजिक कार्यकर्ते भालचंद्र सातार्डेकर व भिकाजी गावडे यांना निवेदन सादर करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here