वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला वेशी भटवाडी येथील ‘चंद्रभागा‘ या नविन विहिरीचे व तेथेच बांधलेल्या पाण्याच्या टाकीचे तसेच वेंगुर्ला नगरपरिषदेला देण्यात आलेल्या चार चाकी, तीन चाकी ऑटो टिपर, स्टेनलेस स्टील टॉयलेट, वेलिग मशिनचे लोकार्पण सोहळा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या हस्ते १४ एप्रिल रोजी झाले. वेंगुर्ला शहराच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नसल्याचे मंत्री केसरकर यांनी सांगितले.https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-सातार्डेकरवाडी-येथील-ट/
यावेळी शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, शहरप्रमुख उमेश येरम, प्रवक्ते सुशिल चमणकर, शहर संघटक श्रद्धा बाविस्कर, सुनिल डुबळे, बाळा दळवी, गणपत केळुसकर, मठ सरपंच रुपाली नाईक, युवानेते अजित नाईक, योगेश तेली, संतोष परब, प्रकाश मोठे, एकनाथ राऊळ, नरेंद्र बोवलेकर, मुख्याधिकारी परितोष कंकाळ, नायब तहसिलदार संदीप पानमंद, पोलिस निरीक्षक अतुल जाधव उपस्थित होते. दरम्यान, सागर गावडे (वडखोल) यांच्या घरापर्यंत जाणारा रस्ता डांबरीकरण करणे व संरक्षक कठड्याचे बांधकाम करणे या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
फोटोओळी – वेशी भटवाडी येथील विहिरीचे लोकार्पण दीपक केसरकर यांचया हस्ते झाले.


