योगगुरू रामदेवबाबांनी कोरोनाच्या रोगावर औषोधोपचार असलेल्या ऍलोपॅथीला ‘मूर्खतापूर्ण विज्ञान’ असे म्हटले होते. देशभरात रामदेवबाबांच्या या वक्तव्यामुळे देशभरातील डॉक्टरांमध्ये संतापाची लाट उसळली होती. इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) कारवाई करण्याची मागणी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडे केली होती. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन योग यांनी त्यानंतर रामदेवबाबा यांच्या ऍलोपॅथीवरील वक्तव्यावर आक्षेप घेतला होता.
त्यांनी रामदेवबाबांना पत्र लिहिले होते आणि या पत्रात ‘तुमच्या वक्तव्यामुळे कोरोना योद्ध्यांचा अपमान झाला आहे. देशाच्या भावना दुखावल्या आहेत. तुमच्या वक्तव्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कमी होऊ शकते. कोरोनाच्या विरोधातील आपली लढाई कमकुवत करू शकते. ऍलोपॅथी औषधांनी कोट्यवधी लोकांचे प्राण वाचवले आहेत. ऍलोपॅथी औषधांच्या सेवनामुळे लाखो लोकांचा मृत्यू झाला आहे, असे म्हणणे अत्यंत दुर्दैवी आहे. तुम्ही तुमचे वक्तव्य मागे घ्यावे.’असे म्हंटले होते.
त्यावर आज वक्तव्य मागे घेत रामदेवबाबा म्हणाले-ऍलोपॅथीने अनेकांचे प्राण वाचवलेआहेत. मी वैद्यकीयशास्त्राच्या प्रत्येक रूपाचा सन्मान करतो.’