चंद्रपूर– घर हे प्रत्येकाचं स्वप्न असते. ही स्वप्नपूर्ती पूर्ण करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘सर्वांसाठी घरे’ ही महत्वाकांक्षी योजना हाती घेतली आहे. राज्य शासनसुद्धा नागरिकांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी कटिबद्ध आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात राज्य शासनाने ‘नमो आवास’ घरकुल योजना सुरू केली आहे. या अंतर्गत येत्या तीन वर्षात राज्यात 10 लाख घरे निर्माण करण्यात येईल, अशी ग्वाही राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिली.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्यातील-शाळांना-15-जून-प/
संजय गांधी निराधार योजनेंतर्गत सुरवातीला 600 रुपये देण्यात येत होते. ते नंतर 1200 रुपये तर आता 1500 रुपये करण्यात आले आहे. शेतकरी सन्मान योजनेत आता 6 हजार रुपयांवरून 12 हजार रुपये देण्यात येतील. याचा लाभ राज्यातील 1 कोटी 15 लक्ष शेतकऱ्यांना होणार आहे. अंगणवाडी सेविका, आशाताई, कोतवाल, शिक्षणसेवक आदींना सरकार मदत करीत आहे, असेही त्यांनी सांगितले.