देश-विदेश: भारताच्या वेदांत समूहाचा डिस्प्ले ग्लास क्षेत्रातील २० कोरियन कंपन्यांशी सामंजस्य करार

0
20
भारताच्या वेदांत समूहाचा डिस्प्ले ग्लास क्षेत्रातील २० कोरियन कंपन्यांशी सामंजस्य करार
भारतीय सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यासह वेदांताचा कोट्राच्या कोरिया बिझ- ट्रेड शो २०२३ येथे यशस्वी रोड शो,

भारतीय सरकारी अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यासह वेदांताचा कोट्राच्या कोरिया बिझ- ट्रेड शो २०२३ येथे यशस्वी रोड शो

मुंबई१७ एप्रिल २०२३ – वेदांता समूहाने डिस्प्ले ग्लास क्षेत्रातील २० कोरियन कंपन्यांशी सामंजस्य करार केल्याचे जाहीर केले असून या करारानुसार भारतात इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्र विकसित केले जाणार आहे कोट्रा या दक्षिण कोरियातील राज्य निधीवर चालणाऱ्या व्यापार आणि गुंतवणूक प्रसार संस्थेने कोरियातील वाणिज्य, उद्योग आणि उर्जा मंत्रालयाच्या सहकार्याने नुकत्याच आयोजित केलेल्या कोरिया बिझ- ट्रेड शो २०२३ कार्यक्रमासाठी वेदांताला रोडशोसाठी आमंत्रित करण्यात आले होते.https://sindhudurgsamachar.in/kokan-पणदूर-महाविद्यालयात-लोक/

आकाश के. हेब्बर, वेदांताच्या सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले व्यवसायाच्या जागतिक व्यवस्थापकीय संचालकांनी भारतात डिस्प्ले फॅब स्थापन करण्याची योजना मांडली. त्यांनी संभाव्य भागीदार व ग्राहकांना वेदांताला सरकारच्या अनुकूल धोरणांच्या मदतीने इलेक्ट्रॉनिक हब स्थापन करण्यासाठी मदत व्हावी म्हणून सहभागी होण्याचे आवाहन केले.

आतापर्यंत ५० पेक्षा जास्त कंपन्यांनी आमच्यासह भागिदारी करण्यात रस दाखवला आहे आणि सांगायला आनंद वाटतो, की आम्ही इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन मूल्य साखळीत कार्यरत असलेल्या २० कोरियन कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे,

असे आकाश के. हेब्बार म्हणाले. ‘भारत सरकारच्या मदतीने आम्ही देशात उपलब्ध असलेल्या गुंतवणुकीच्या मुबलक संधी तसेच त्याला अनुकूल धोरणे, दर्जेदार गुणवत्ता व नाविन्यपूर्ण यंत्रणेचा पाठिंबा असल्याचे दर्शवले.’

कोरियाच्या इलेक्ट्रॉनिक उद्योगात आघाडीवर असलेल्या व्यावसायिकांपुढे आपली योजना मांडताना आकाश यांनी प्रस्तावित इलेक्ट्रॉनिक उत्पादन केंद्राची व्याप्ती व आकार उलगडला. ते म्हणाले, की या केंद्रामध्ये १५० पेक्षा जास्त कंपन्यांना आकर्षित करण्याची आणि एक लाख प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष रोजगार तयार करण्याची क्षमता असेल. ते असेही म्हणाले, की वेदांताचे ग्रीनफील्ड डिस्प्ले फॅब या प्रस्तावित केंद्राच्या अँकर्सपैकी एक असेल आणि भारतात गुंतवणूक करण्यास इच्छुक असलेल्या कोणत्याही कंपनीस आम्ही मदत करण्यास तयार आहोत.

भारतीय सरकारी अधिकारी – एच. ई. अमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली – भारताचे दक्षिण कोरियातील राजदूत या रोडशोमध्ये सहभागी झाले होते व त्यांनी यावेळेस गुंतवणुकीस अनुकूल असलेल्या भारताच्या धोरणांची माहिती दिली. श्री. अमित कुमार म्हणाले, की भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उद्योग हा देशातील सर्वात वेगवान उद्योगांपैकी एक आहे आणि तो देशांतर्गत मागणी, सरकारी सवलती व ग्राहकांची वाढती क्रयशक्ती यांच्या जोरावर २०२६ पर्यंत ३०० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. यामुळे तंत्रज्ञान, कौशल्य आणि नाविन्यतेसाठी प्रसिद्ध असलेल्या कोरियन कंपन्यांना आकर्षक संधी मिळतील व विस्तृत आणि वाढत्या भारतीय बाजारपेठेचा लाभ घेता येईल याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मनिश नाईक, सहाय्यक संचालक, आयसीटी आणि ई- प्रशासन, डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजी (जीएसईएम), गुजरात सरकार यांनी डोलेरा एसआयआर या भारतातील पहिल्या औद्योगिक ग्रीनफील्ड स्मार्टसिटीद्वारे उपलब्ध केल्या जात असलेल्या पायाभूत सुविधा दर्शवल्या तसेच कोरियन कंपन्यांसाठी सरकारच्या सवलतींची माहिती दिली.

डिसेंबर २०२२ मध्ये वेदांताला जपानमधील अशाच प्रकारच्या रोडशोमध्ये सहभागी होण्याचे आमंत्रण मिळाले होते व त्यात १०० कंपन्यांचे २०० पेक्षा जास्त प्रतिनिधी सहभागी झाले होते. या रोडशोची सांगता होईपर्यंत वेदांताने ३० जपानी कंपन्यांशी सामंजस्य करार केला होता.

वेदांता समूह कंपनी अवांनस्त्रेत इंक ही डिस्प्ले ग्लास उद्योगातील प्रवर्तक कंपनी असून कोरिया व तैवानमध्ये त्यांच्या उत्पादन सुविधा कार्यरत आहेत. अवांनस्त्रेतचा कोरियामधील पित्यांक- सी कारखाना गेल्या १५ वर्षांपेक्षा जास्त काळापासून सुरू आहे आणि तेथे जेन ४ व जेन ८ टीएफटी डिस्प्ले ग्लासचे उत्पादन केले जाते. हा कारखाना कंपनीचे आर अँड डी केंद्र असून सध्या तिथे वेफर ग्लास, अल्ट्रा- थिन ग्लास, अत्याधुनिक कव्हर ग्लास आणि एव्ही/व्हीआर ग्लास अप्लिकेशन्स विकसित करण्यावर काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here