मुंबई, २४ एप्रिल : सी.सी.आय. आयोजित पहिल्या राजसिंग डुंगरपूर चषक या १५ वर्षाखालील मुलांच्या क्रिकेट स्पर्धेत एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमी, अवर्स क्रिकेट अकादमी आणि मुंबई क्रिकेट क्लब या संघानी विजयी सलामी दिली. अवर्स क्रिकेट अकादमी संघाने २० षटकांत २ बाद १८३ धावांचा डोंगर उभारत प्रतिस्पर्धी यजमान सी.सी.आय. किड्स अकादमी संघाला ८ बाद ११७ धावांवर रोखून ६६ धावांनी मोठा विजय मिळविला. अन्य एका लढतीत मुंबई क्रिकेट क्लब संघाने प्रथम फलंदाजी करीत ५ बाद १५० धावांचे लक्ष्य उभारीत प्रतिस्पर्धी अविनाश साळवी फौंडेशन संघाला ९ बाद ७९ धावांवर रोखत स्पर्धेत विजयी सलामी दिली.https://sindhudurgsamachar.in/मनोरंजन-अल्ट्रा-झकास-ओटी/
अवर्स क्रिकेट अकादमी संघाने एल्टन सोरेस यांच्या नाबाद ६५ धावांच्या खेळीमुळे २० षटकांत २ बाद १८३ धावा केल्या. एल्टन याने प्रथम ओम मालकर (२८) याच्या साथीने ५७ धावांची सलामी दिली, त्यानंतर दुसऱ्या विकेटसाठी दर्श थेसियासह (३१) ४८ धावांची तर वेदांत पाटीलसह तिसऱ्या विकेटसाठी 78 धावांची अभेद्य भागीदारी रचली. या आव्हानासमोर यजमान संघाचा डाव ८बाद ११७ धावांवरच सीमित राहिला.
मुंबई क्रिकेट क्लब संघाच्या ५ बाद १५० या धावसंख्येत सैफ खान नाबाद ४७ आणि कार्तिक कुमार ४९ यांचा सिंहाचा वाट राहिला. त्यानंतर कार्तिक कुमार (९ धावांत ४ बळी) आणि शौर्य राय (१३/२) व धैर्यशील देशमुख (१२/२) यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवत अविनाश साळवी फौंडेशन संघाला ९ बाद ७९ धावातच रोखले.
एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमी संघाने साळगावर स्पोर्ट्स क्लब विरुद्ध ६ विकेट्सनी मात करीत विजयी सलामी दिली. सकाळच्या सत्रात झालेल्या लढतीत त्यांनी साळगावकर स्पोर्ट्स क्लब संघाला १९.४ षटकांतच ७४ धावांत गुंडाळून विजयाचे लक्ष्य १६.२ षटकांत चार विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केले. साळगावकरच्या डावात पावन श्रीवास्तव १८, अनीश जाधव ११ आणि अनुराग राय १३ यांचा अपवाद वगळता त्यांच्या अन्य फलंदाजांना दोन आकडी मजल मारता आली नाही. शॉन कोरगावकर याने प्रभावी गोलंदाजी करताना १२ धावांत २ बाली मिळविले. त्यानंतर प्रचित आमकर ३७, आराध्य चव्हाण १२ आणि अभिनव चौधरी नाबाद १२ यांनी संघाचा विजय साकारला. त्यांना विजयाचे दोन गुण मिळाले. दुसऱ्या लढतीत ड्रीम ११ वेंगसरकर क्रिकेट अकादमी विरुद्ध संजीवनी क्रिकेट अकादमी संघ आज येऊ शकला नाही.
संक्षिप्त धावफलक – साळगावकर सपोर्ट्स क्लब – १९.४ षटकांत सर्वबाद ७४ (पवन श्रीवास्तव १८, अनीश जाधव ११, अनुराग राय १३; शॉन कोरगावकर १२/२) पराभूत वि. एजिस फेडरल वेंगसरकर क्रिकेट अकादमी – १६.२ षटकांत ४ बाद ७४ (प्रचित आमकर ३७, आराध्य चव्हाण १२, अभिनव चौधरी नाबाद १२; मोहन बहादूर ७/२).
मुंबई क्रिकेट क्लब – २० षटकांत ५ बाद १५० (इंद्रनील निकम २३, आकाश मांगडे १७, सैफ खान नाबाद ४७, कार्तिक कुमार ४९) वि.वि. अविनाश साळवी फौंडेशन – २० षटकांत ९ बाद ७९ (श्रावण हजारे ४०; कार्तिक कुमार ९/४ , शौर्य राय १३/२, धैर्यशील देशमुख १२/२)
अवर्स क्रिकेट अकादमी २० षटकांत २ बाद १८३ (ओम मालकर २८, एल्टन सोरेस नाबाद ६५, दर्श थेसिया ३१, वेदांत पाटील नाबाद २८) वि. वि. सी.सी.आय. किड्स अकादमी- २० षटकांत ८ बाद 117 (नीरज धुमाळ १७, सुमेर सिंग ३८, आर्यन देसाई नाबाद १७; नमीष पाटील १२/२, क्रिश यादव १६/२).
अवर्स क्रिकेट अकादमी, एजिस फेडरल वेंगसरकर अकादमीची विजयी सलामी